*आमदार बाबनदादा शिंदे यांना पडला पंढरपूर तालुक्यातील माढा विधानसभा मतदार संघातील 42 गावांचा विसर* - *42 गावातील रस्त्यांची दुरावस्था, करकंब कृषी मंडल कार्यालय अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत*

*आमदार बाबनदादा शिंदे यांना पडला पंढरपूर तालुक्यातील माढा विधानसभा मतदार संघातील 42 गावांचा विसर*  - *42 गावातील रस्त्यांची दुरावस्था, करकंब कृषी मंडल कार्यालय अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत*

करकंब/प्रतिनिधी-
   पंढरपूर तालुक्यातील 42 गावांचा समावेश माढा मतदार संघात झाला आणि या गावांच्या विकास कामांना खीळ बसली.या मतदार संघाचे आमदार माढा तालुक्यातील आणि जनतेला आपल्या कामांसाठी पंढरपूर तालुक्याच्या ठिकाणी जावे लागले.अनेक ग्रामीण भागातील खेडो-पाडी असलेल्या रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे.अक्षरशः रस्ते खड्डयात गेले आहेत.करकंब-सांगवी,करकंब-नांदोरे,भोसे-पटवर्धनकुरोली,करकंब-घोटी या रस्त्यांवर तर सध्या मोठं मोठे खड्डे पडले आहेत.तसेच येथील कृषी मंडल कार्यालयही मागील काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहे.मात्र याकडे लोकप्रतिनिधी नी दुर्लक्ष केल्यामुळे जनतेला  मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
   चालू हिवाळी अधिवेशनात या भागातील आमदार बाबनदादा शिंदे यांनी माढा तालुक्यातील रस्त्यांसह विविध कामांसाठी 42 कोटी रुपये मंजूर करून घेतले परंतु या मतदार संघातील 42 गावांना एक दमडाही मिळणार नाही का? या भागातील खेडो-पाड्यातील नागरिकांनी अजून किती दिवस नरकयातना सहन करायच्या असा प्रश्न उपस्थित होत आहे.
   करकंब येथील कृषी मंडल कार्यालयावर 26 गावांचा कारभार आहे परंतु हे कार्यालय मागील काही वर्षांपासून घाणीच्या साम्राज्यामुळे बंद अवस्थेत पाहायला मिळत आहे.वृत्तपत्रामधून अनेक वेळा हे कार्यालय घाणीच्या साम्राज्यात असल्याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या तरीही या भागातील लोकप्रतिनिधी यांना जाग आलेली दिसत नाही.या कार्यालयाच्या आवारात संरक्षक भिंत बांधल्यास येथील घाणीचा प्रश्न मिटणार आहे

.
    या भागातील खेडो-पाड्यातील नागरिकांना अनेक कामांसाठी करकंब व पंढरपूर सारख्या मोठ्या बाजारपेठा असलेल्या ठिकाणी विविध कामांसाठी जावे लागत असते परंतु या भागाती रस्त्यावर मोठं-मोठे खड्डे पडले असल्याने लहान मोठे अपघात होत असतात.करकंब-नांदोरे रस्त्यावर तर सध्या सुरू असलेल्या ऊसाच्या सिजनमुळे अनेक वेळा ऊसाने भरलेल्या ट्रेलर पलटी होत आहेत त्यामुळे वाहन धारकांना आपला जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.
     त्यामुळे या भागातील लोकप्रतिनिधी आमदार बबनदादा शिंदे यांनी 42 गावातील रस्ते दुरुस्तीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ते व्हावेत व करकंब येथील कृषी कार्यालय सुरू करावे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.