*मोहोळच्या मंडळाकडून राजू खरे यांना निमंत्रण* *मिरवणुकीचा नारळ फोडून जंगी मिरवणूक*

पंढरपूर/प्रतिनीधी
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सगळीकडे उत्साहात सुरू आहेत. मोहोळ शहर आणि ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहेत. यामधून मोहोळचे उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्यावर या भागातील मंडळांनी भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे त्यांना विशेष निमंत्रण देऊन मिरवणुकीचा नारळ खरे यांच्या हस्ते फोडून शुभारंभ करण्यात आला आहे.
मागील अनेक वर्षापासून राजू खरे आणि मोहोळ विधानसभा मतदार संघ हे एक चांगलेच नाते तयार झाले आहे. या मतदार संघातील तरुण वर्गासह सर्वच लोकांनी आमदार करण्यासाठी मनाची तयारी ठेवली आहे.त्यामुळे मोहोळ, उत्तर सोलापूर आणि पंढरपूर भागातून विविध कार्यक्रमासाठी खरे यांना निमंत्रित करण्यात येत आहे. त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदार संघात खरे यांची ताकद वाढली आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ शहरांमध्ये असलेल्या मोहोळ मध्यवर्ती मंडळाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त न भूतो न भविष्यती अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोहोळ शिवसेना नेते व उद्योजक राजू खरे यांच्या उपस्थितीखाली मिरवणुकीचा नारळ फोडून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.
मोहोळ शहरांमध्ये असलेल्या बुद्धविहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यस्मारकाचे दर्शन घेतले. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत, मोहोळ शहरातील मंडळांनी राजू खरे यांचा यथोचित सन्मानाचा फेटा घालत सत्कार करण्यात आला. मिरवणुकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत जल्लोषात मिरवणूक साजरी करण्यात आली.
याप्रसंगी हजारो आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यानंतर मुख्य मार्गाने मार्गस्थ होत ढोल ताश्यांच्या गजरात तरुणांनी ताल धरताच राजू खरे यांनीही कुठल्याही प्रकारचा गर्व न करता सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून स्वतःही मिरवणुकीत मिसळले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांशी आपुलकीचे नाते राहिले. त्यांच्या समवेत मोहोळ, उत्तर सोलापूर, पंढरपूर भागातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.