*ऐन निवडणुकीच्या हंगामात बंधुप्रेमाची होतेय चर्चा....!* *निवडणुकींच्या भाऊबंदकीतील राजकीय वैमनस्य सोडून बंधू प्रेम आले उफाळून..... हातात खराटे घेऊन लागले गाव स्वच्छ करून....! .*जागर गाव स्वच्छता अभियानात बंधू प्रेमाने... ..गावकरी बसले एकमेकाला मात्र कवटाळून* *बंधू प्रेमाच्या चर्चेने काकांना बापूची साथ.......?

 *ऐन निवडणुकीच्या हंगामात बंधुप्रेमाची होतेय चर्चा....!* *निवडणुकींच्या भाऊबंदकीतील राजकीय वैमनस्य सोडून बंधू प्रेम आले उफाळून..... हातात खराटे घेऊन लागले गाव स्वच्छ करून....!  .*जागर गाव स्वच्छता अभियानात बंधू प्रेमाने... ..गावकरी बसले एकमेकाला मात्र कवटाळून* *बंधू प्रेमाच्या चर्चेने काकांना बापूची साथ.......?

*करकंब /प्रतिनिधी*

करकंब हे एक आशिया खंडातील असे एक बहुचर्चित गाव आहे.. या गावात कधी काय घडेल, कधी कशाची चर्चा होईल... आणि या चर्चेतून पुढे काय होईल. हे कसं काय? अशा बर्‍याचशा चर्चा गावगाड्यातील करकंब ग्रामस्थांतून विशेषता युवक वर्गातून चर्चिला जात आहेत. त्याला कारणही तसेच कार्यक्रम होता, जागर स्वच्छता अभियानांतर्गत करकंब गाव स्वच्छ करण्याचा या कार्यक्रमास विशेषता कर्जत नगरपंचायत चे मुख्य अधिकारी गोविंद जाधव यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ बरोबरच सत्ताधारी व विरोधक तसेच विविध संघटनातील पदाधिकारी पत्रकार गाव स्वच्छ करण्याचा संकल्पाने एकत्र येऊन जे करकंब येथील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अकरा संजीवनी समाधि पैकी तसेच पुरातन प्रसिद्ध गणेश मंदिर (टेकडी), आणि संत निवृत्तीनाथ महाराज पालखी तळ व हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी ज्या ज्ञानमंदिरा मध्ये ज्ञानार्जन घेतात .अशा पवित्र ठिकाणी या सर्वच ग्रामस्थांनी ग्राम स्वच्छतेची शपथ घेतली. यापूर्वी गावाला ग्रामस्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आहे .विशेष, म्हणजेच यापूर्वी संकल्प करण्यापूर्वी गाव अगदी गल्ली -बोळातून ते मुख्य रस्ते असो गावात येणारे सगळीकडचे मार्ग असो मोठ्या प्रमाणात जे , जिल्ह्यात झाले नाही ,असे स्वच्छतेचे अतिशय उत्कृष्ट गाव स्वच्छतेचे काम(गाव साफ करण्याचे काम) अतिशय सफाईदार पणाने केलेले लोकांना दिसत असल्याची चर्चाही आहे. त्यात आता अजून ग्रामस्थांनी पुन्हा गाव संपूर्ण स्वच्छता करण्याचा संकल्प केला .आणि या संकल्प कार्यक्रमास सगळे ग्रामस्थ उपस्थित राहिले,सत्ताधारी-विरोधक त्यातच सगळे ग्रामस्थ विविध संघटनांचे पदाधिकारी आणि पत्रकार विशेषता महिला भगिनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मात्र सुरुवातीच्या भाषणांमध्ये सत्ताधारी गटाचे प्राध्यापक सतीश देशमुख यांनी आम्ही राजकीय जोडे बाहेर ठेवून या संकल्पाचे कौतुक  करून आपले आपले बंधू असा उल्लेख जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांचा या कार्यक्रमात मान्यवर म्हणून उल्लेख करूनत्यांनी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचा उल्लेख यावेळी केला. त्यानंतर याच कार्यक्रमात त्यांचेच बंधू माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांनीही त्याच ठसक्यात आमचे बंधू सतीश देशमुख बंधू यांचे नावाचा उल्लेख करूनआमचे बंधू ने या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा उल्लेख केला असल्याचे सांगितले.  कार्यक्रम झाला. गाव स्वच्छतेचा संकल्प करण्याचा.... पण कार्यक्रमात आणि कार्यक्रम झाल्यानंतरही सध्या चर्चा होते ,ती इतके दिवस राजकीय विरोधक (वैर), राजकीय वैमनस्य असलेले हे दोन चुलत बंधू गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांची कधी नावे तर सोडाच पण प्रत्येक कोणतीही निवडणूक आली की वाद-विवाद तक्रारी नेहमीच एकमेकांच्या विरोधात समोर उभी असतात. एकमेकांच्या विरोधात असलेले हे बंधू त्यातच राजकीय वैर ,वैमनस्य सोडून या कार्यक्रमानिमित्त उफाळून आलेले बंधुप्रेम यामुळे गावकऱ्यांमध्ये सध्या जागर स्वच्छता कार्यक्रमाच्या ऐवजी या बंधुप्रेमाची चर्चा मात्र ग्रामस्थांमधून जोरदार  होत आहे .आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा हंगाम सुरू होणार आहे. शेवटी राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो. आणि कोणी कुणाचा मित्र नसतो. शेवटी जनता काय बोलेल ,काय चर्चा करेल याविषयी राजकीय वर्तुळातून विशेष महत्व असते*
    करकंब येथील पवित्र असलेल्या या ठिकाणी या बंधू नी गाव स्वच्छतेच्या संकल्पनेने हातात खराटे घेऊन गाव स्वच्छ करण्याचा संकल्प केला. त्याचे फोटो सेशन ही झाले... पण गेल्या अनेक वर्षापासून या पवित्र असलेल्या ठिकाणी हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी येतात. त्यांना चालण्यासाठी किमान रस्ता तरी सुव्यवस्थित असावा. त्यांचे आरोग्य तरी चांगले राहावे, त्यातच अनेक भाविकांचे याठिकाणी श्रद्धास्थान असल्याने अनेक भाविक भक्त महिला याठिकाणी श्रद्धेने येतात. विशेष म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मुक्काम याच पवित्र ठिकाणी असते. मात्र गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासूनची जी अवस्था आहे .तीच अवस्था आजच्या स्थितीला आहे तशीच आहे. निधी येतात निधी जातात... पण अस्वच्छता घाणीचे साम्राज्य तुंबलेल्या गटारी नसलेले रस्ते हे यापूर्वी का झाले नाही.अशी चर्चा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. सत्ताधारी तुम्हीच होता ... आणि विरोधक तुम्हीच होता. जागर गाव स्वच्छता च्या अभियानात ,तुमचे बंधुप्रेम आले उफाळून... गावकरी बसले आता एकमेकांना कवटाळून अशी चर्चा ग्रामस्थांतून होत आहे*


   त्यामुळे ऐन निवडणुकीच्या हंगामात या बंधू प्रेमाच्या चर्चेने गावात एकच खळबळ उडाली असून या बंधू प्रेमाच्या चर्चेत काकांना.... बापू...ची. साथ.....? अशीही चर्चा ग्रामस्थ करीत आहेत*