*राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचा संघटना बांधणीसाठी धुमधडाका* *उद्या रविवारी होणार सदस्य नोंदणी अभियानाचा आणि वेबसाइटचे उदघाटन* *राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा उपस्थित पुणे येथे होणार कार्यक्रम* *उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्याकडून उपास्थित राहण्याचे आवाहन*

*राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचा संघटना बांधणीसाठी धुमधडाका*  *उद्या रविवारी होणार सदस्य नोंदणी अभियानाचा आणि वेबसाइटचे उदघाटन*  *राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा उपस्थित पुणे येथे होणार कार्यक्रम*  *उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्याकडून उपास्थित राहण्याचे आवाहन*

पंढरपूर/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी नागेश फाटे यांची निवड झाल्यापासून या विभागातील कार्यकर्त्यामधून एक राष्ट्रवादीची स्वतंत्र फळी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने कार्यरत असल्याचे चित्र राष्ट्रवादीच्या गोठातून पाहावयास मिळत आहे.        त्याचाच एक भाग म्हणून ,उद्या रविवार  दि २७ मार्च रोजी पुणे येथे
 सदस्य नोंदणी अभियानाचा आणि वेबसाइटचे उदघाटन
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा उपस्थित पुणे येथे होणार आहे.
     प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी आपली निवड होताच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात  सर्व पदाधिकारी यांच्याशी बैठकाचे आयोजन करीत जवळपास दोनवेळा दौरा पूर्ण केला आहे. या बैठकीतून कार्यकर्तेची फौज वाढवीत नवीन पदाधिकारी निवडीही पार पडल्या आहे.
    उद्योग व व्यापार सेलच्या या कार्यावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेमंडळी जाम खुश असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात इराणचे राजदूत डॉ अली चेगेनी यांच्या बरोबर चर्चात्मक बैठक घेण्यात आली होती. यामध्येही विविध उद्योग व व्यापार मधील संधी बाबत चांगली फायदेशीर चर्चा झाली आहे.
  आशा या सतत संघटना वाढीसाठी प्रयत्नशील दिसून येत असलेल्या उद्योग व व्यापारी विभातून आता ,कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण करण्यासाठी उद्या रविवारी पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्ड जवळील  हॉटेल निसर्ग येथे दुपारी एक वाजता सदस्य नोंदणी आणि वेबसाईटचे उदघाटन सोहळा होणार आहे.
 वरील कार्यक्रमासाठी पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, भगीरथ भालके, यांच्यासह राज्यातील राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत. तरी वरील कार्यक्रमसाठी राज्यातील राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार सेलच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी वेळेवर वरील ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी केले आहे.