*श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर.. आजादी का अमृत महोत्सव .... चे औचित्य साधून वृक्षारोपण.....!* *जिल्ह्याचे नेते प्रशांत मालक परिचारक यांच्या शुभहस्ते झाले वृक्षारोपण.

करकंब /प्रतिनिधी
:-देगाव, नारायण चिंचोली ता पंढरपूर या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त मोहोळ ते पंढरपूर हायवे रोडवर लगत असलेल्या जागेत सोलापूर जिल्ह्याचे अभ्यासून नेते, मा.आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण कार्यक्रमसंपन्न झाला.
यावेळी श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनवडे, देगाव चे सरपंच संजय भाऊ घाडगे, सोसायटी चेअरमन भीमराव घाडगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष धनंजय घाडगे काशिनाथ घाडगे दिनकर गोपने नागनाथ फराटे तसेच विविध पदाधिकारी बहुसंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.