*श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीत करकंब करांचा सिंहाचा वाटा-युवराज दादा पाटील* *विरोधकांनी हवेत वार करू नये-गणेश दादा पाटील*

*श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीत करकंब करांचा सिंहाचा वाटा-युवराज दादा पाटील*   *विरोधकांनी हवेत वार करू नये-गणेश दादा पाटील*

करकंब/ प्रतिनिधी :-

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांच्या स्थापनेपासून करकंब सह 42 गावातील सभासद , कामगार वर्ग आणि सामान्यांच्या सामाजिक हिताचे काम या भागातील कै. सहकार रत्न कृष्णातभाऊ पुरवत यांचे सहकारी कै. उत्तरेश्वर गुळमे, कै.शेट्टी भवानी पाटील गुरुजी,कै. पांडुरंग पुरवत,कै. भागवत अण्णा बोचरे, कै. पोपट तात्या पुरवत माजी सरपंच, कै. निवृत्ती गुळमे माजी सरपंच,कै. हरिचंद्र शिंगटे, कै. प्रकाशदादा कानडे, देवकते गुरुजी यांच्या माध्यमातून समान न्याय देण्याची भूमिका घेऊन सर्वांना बरोबरीने घेऊन या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीमध्ये करकंब करांचा मोठा सिंहाचा वाटा असल्याचे मत श्री विठ्ठल साखर कारखान्याचे भावी चेअरमन युवराज दादा पाटील यांनी करकंब येथे आयोजित केलेल्या सभासद कामगार आणि ग्रामस्थांच्या व पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी दीपक दादा पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गणेश दादा पाटील, माजी सरपंच दिलीप नाना पूरवत, माजी उपसरपंच बाळासाहेब शिंगटे, आदिनाथ दादा देवकते, विठ्ठल पांढरे एडवोकेट दादासाहेब देशमुख प्राध्यापक पाटील सर, विरोधी पक्ष नेते राहुल काका पूरवत, बंडू काका गुळमे, जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष शहाजी मुळे , रामकृष्ण जवळेकर जीवराज चव्हाण, बाहुबली पूरवत,विनायक कापसे, दत्तात्रय काळे,ग्रामपंचायत सदस्य बापू नाना शिंदे, मोहन शिंगटे, बापूराव माने, सुभाष बोचरे, आदी मान्यवरांसह करकंब येथील बहुसंख्य सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी करोळे उंबरे सांगवी राणापुरी जळवली नेमतवाडी सांगवी नांदोरे बार्डी आधी गावातील अनेक सभासद पदाधिकारी या मेळाव्यात हजर होते.
पुढे बोलताना युवराज दादा पाटील यांनी सांगितले की, आपल्या सर्व सभासदांच्या विश्वासावर यापुढील काळात एक महिन्याच्या आत सर्व सभासदांची राहिलेली बील, कामगारांचे थकीत पगार यासह सर्वांना न्याय देण्याची भूमिका निश्चित पणाने पार पडणार असल्याचे सांगितले.
यावेळी गणेश दादा पाटील यांनी सभासदांना आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून आज पर्यंत सभासदांनी ठेवलेल्या विश्वासावर यापुढेही काम केले तसेच विरोधकांनी हवेत वार करून टीका करून सभासदांची दिशाभूल करू नये असे आवाहन केले. यावेळी उपस्थित सभासद मान्यवरांनीही या कारखान्यासंदर्भात ली मनोगत व्यक्त करून आपल्या भावना यावेळी मांडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक पाटील सर यांनी केले तर उपस्थित मान्यवर सभासद वर्ग आणि ग्रामस्थांचे आभार विरोधीपक्षनेते राहुल काका पूरवत यांनी मानले .