*पंढरीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्ताने कार्यक्रम* *अनेक शासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षाचे नेत्यांना निमंत्रण*

पंढरपूर/प्रतिनीधी
पंढरपूर शहर आणि तालुका मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील अनेक शासकीय अधिकारी आणि विविध राजकीय पक्षाचे मान्यवर नेतेमंडळीना निमंत्रित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये बुधवारी सकाळी ९वाजता राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन पंढरपूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सुशीकुमार बेल्हेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, उपजिल्हाधिकारी तथा पंढरपूरचे अप्पर तहसीलदार समाधान घुटुकडे, शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पो. नि. अरुण फुगे, मुख्याधिकारी अरविंद माळी, जि. प बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय लवटे, सहा.पो. नि मनोज सोनलकर, शाखा अभियंता एस एस थोरात, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पाणीपुरवठा शाखा अभियंता सदाशिव पुजारी,स.पो. नि. शंकर वलेकर, भीमा पाठबंधारे विभागाचे उप अभियंता महेश चौगुले , शाखा अभियंता उमेश शिंदे, यांच्यासह अनेक डॉक्टर यांची उपस्थिती राहणार आहे.याच दिवशी दुपारी वृद्धाश्रम येथे मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे.
गुरुवार दि १जून रोजी सायंकाळी ५वाजता भव्य मिरवणूक निघणार आहे.त्यापूर्वी या जयंतीनिमित्त विविध राजकीय नेत्यांना निमंत्रित केले आहे. यामध्ये पांडुरंगचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, आ. समाधान आवाताडे, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, दामाजीचे व्हा. चेअरमन तानाजी खरात, शेकापचे डॉ बाबासाहेब देशमुख, मनसे नेते दिलीप धोत्रे, धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळूंगे, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, धनराज शिंदे, डॉ बी पी रोंगे, नगराध्यक्ष साधनाताई भोसले, नागेशकाका भोसले, भास्कर कसगावडे, स्वेताताई डोंबे, समाजसेवक संजयबाबा ननवरे, गणेश अंकुशराव, आदी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे.
वरील सर्व कार्यक्रम यावर्षीची मध्यवर्ती महोत्सव समितीचे अध्यक्ष माऊली हळनवर,उपाध्यक्ष बबन येळे, मनोज खांडेकर,कार्याध्यक्ष सूरज लवटे, स्वागताध्यक्ष संतोष बंडगर, आण्णा सलगर,सचिव बिरुदेव मासाल, हनुमंत शेंडगे, राहुल गावडे. सहसचिव तानाजी सलगर, प्रसाद कोळेकर, वैभव अलदर, मिरवणूक प्रमुख शालीवान कोळेकर, सुभाष मस्के, सोमनाथ ढोणे, संजय माने, गणेश गावडे, बिरुदेव कोकरे, बालाजी पाटील, अनिकेत मेटकरीयांच्यासह विविध पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजातील नेते आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.