*करकंब प्रहार दिव्यांग संघटनेची बैठक उत्साहात संपन्न*.  

*करकंब प्रहार दिव्यांग संघटनेची बैठक उत्साहात संपन्न*.  

करकंब  / प्रतिधीनी

येथील प्रहार दिवांग संघटनेची नवीन वर्षाचे औचित्य साधून करकंब प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये विविध विषयावर चर्चा करून उत्साहात बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये अपंगाचे पुनर्वसन घरकुल योजना अंतोदय रेशन कार्ड जॉब कार्ड तसेच अपंगाचा रखडलेला 5% ग्रामनिधी अद्याप देण्यात आल्या नसून याबाबत सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांच्याबरोबर संघटनेची सविस्तर चर्चा करून निधी देणेबाबत विनंती करणार असल्याचे या वेळी सर्वानुमते ठरले. तसेच ग्रामीण भागातील अपंगांना पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. अपंग घरकुल योजनेचे 24 लाभार्थी अर्ज सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर कर केले असून अपंगाचा पात्र प्रपत्र डॉ मध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे. सन 2018 मध्ये झालेल्या प्रपत्र ड घरकुल योजनेमध्ये अपंगा चा समावेश केलेला नसून सन दोन हजार अठरा आवास योजना पंतप्रधान घरकुल योजना यामध्ये अपंगाचा पुन्हा एकदा सर्वे करून या सर्व अपंगांना विना आट घरकुल योजनेत समाविष्ट करून घेण्याची विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्याकडे केली आहे.
 सोलापूर ग्रामीण विकास यंत्रणेकडे करकंब येथील सर्व दिव्यांग  यादी असून ग्रामपंचायत ने या दिव्यांगांचा सर्वे केला नाही. करकंब येथे ५४दिव्यांग ऑनलाईन ची यादी सोलापूर ग्राम विकास यंत्रणेकडे असते, तर ही माहिती ग्रामपंचायत कडे का उपलब्ध नाही? तरी करकंब ग्रामपंचायतने या सर्व दिव्यांगा चा पुन्हा घरोघरी सर्वे करून ग्रामपंचायत कडे ऑनलाइन अध्यावत यादी तयार करून या सर्व दिव्यांग अपंगांना घरकुल योजनेत समाविष्ट करावे .व त्यांना मिळणारे लाभ मिळावेत. याचा गांभीर्याने व सहानुभूतीने विचार करावा; अन्यथा याचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल .असा इशारा यावेळी देण्यात आला.या बैठकी प्रसंगी शहराध्यक्ष उमेश गोडसे, शाखाध्यक्ष महेंद्र लोंढे, बाळू पेठकर प्रकाश शिंदे आदीसह बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.