*बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्षपदी रामदास खराडे यांची फेरनिवड*

*बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्षपदी रामदास खराडे यांची फेरनिवड*

करकंब/ प्रतिनिधी:-
                बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करून पुन्हा नव्याने कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली.त्यामध्ये पुन्हा जिल्हा अध्यक्षपदी एकमताने रामदास खराडे यांची निवड करण्यात आली.
             सदर निवडीची प्रक्रिया पंढरपूर येथे शासकीय विश्रामगृहात पार पडली.यावेळी संस्थापक अध्यक्ष नितीन बागल,महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक मुल्ला,राज्ययुवा प्रदेशाध्यक्ष डॉ उमेश देशमुख,राज्य प्रसिद्धीप्रमुख रमेश गणगे,पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सुरेखा जाधव, सोलापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष उज्वलाताई खुणे इत्यादी उपस्थित होते.
              यावेळी जिल्हाध्यक्ष रामदास खराडे यांची पुन्हा एकदा निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी संघटनेतील सर्व  पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी वर्ग ग्रामस्थ,टेंभुर्णी परिसरातील अनेक शेतकरी वर्ग यांनी शुभेच्छा दिल्या.