*आठ महिन्यापासून फरार असलेला आरोपी अखेर करकंब पोलिसांच्या जाळ्यात......!* *आरोपीस चार दिवसाची पोलीस कोठडी* *मिसिंग, अल्पवयीन मुलीस पळवून नेलेबाबत हे गुन्हे उघडकीस आणण्यात करकंब पोलीस ठाणे अग्रेसर.*

करकंब/ प्रतिनिधी:-
गेल्या आठ महिन्यापासून करकंब पोलिसांना गुंगारा देऊन असलेल्या आणि एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फरार असणारा आरोपी प्रकाश अशोक काळे. (रा. परिते ता. माढा) यास करकंब पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. करकंब पोलिस व अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष सोलापूर यांनीही संयुक्त कारवाई केली आहे.
सदर आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून याबाबत पुढील अधिक तपास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु हे करीत असून पुढील तपासासाठी पोलीस हे .कॉ . आर.आर. जाधव पोलीस हे .कॉ. बालाजी घोळवे, पोलीस कॉ. दया हजारे हे पथक रवाना झाले आहे.
करकंब पोलिस ठाणे अंतर्गत कोरोना कालावधीपासून गेल्या दोन-तीन वर्षात दाखल झालेल्या मिसिंग तसेच अल्पवयीन मुलीस पळवून नेणे बाबतचे गुन्हे या अनुषंगाने करकंब पोलिसांनी प्रचंड मेहनत घेऊन दाखल झालेले गुन्हे उघडकीस आणण्यात मोठे यश मिळवले असून याबाबत करकंब पोलीस ठाणे अग्रेसर असल्याची चर्चा सामान्य वर्गातून केली जात आहे.