*करकंब येथे उद्या शुक्रवारी सकाळी सहा वाजता सद्गुरू गजानन बप्पा समाधी पुष्पवृष्टी सोहळा.....!*

*करकंब येथे उद्या शुक्रवारी सकाळी सहा वाजता सद्गुरू गजानन बप्पा समाधी पुष्पवृष्टी सोहळा.....!*

करकंब प्रतिनिधी

:- येथील 
सद्गुरु भजलिंग महाराज मठामध्ये सद्गुरु गजानन बाप्पा महाराज यांच्या ५४ व्या समाधी सोहळ्यानिमित्त केली सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाने करकंबकर भक्ती रसात  तल्लीन झाले आहेत. सद्गुरु गजानन बाप्पा महाराज यांच्या ५४ व्या समाधी सोहळ्यानिमित्त उद्या शुक्रवार दिनांक-१०/०२/२०२३ रोजी सकाळी सहा वाजता पुष्पृष्टीचा उत्सव संपन्न होणार आहे.
       करकंब येथील सद्गुरू भजलिंग महाराज मठामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे श्री सद्गुरू गजानन बप्पा यांच्या ५४ समाधी सोहळ्यानिमित्ताने आयोजित सहावे कीर्तन पुष्प गुंफताना ह.भ.प.जयवंत महाराज यांनी सांगितले.नाम गोड नाम गोड या संत तुकाराम महाराजांच्या गोड अभंगावर निरुपण करीत असताना सांगितले की मनुष्य फक्त घेण्याचं काम करतो, देव घेतो आणि मगच देतो पण संतांचा असा नियम स्वभाव आहे की ते काही न घेताच सर्वस्व देतात .आणि मनुष्याच्या जीवनाचा उध्दार करतात,यावर अनेक दृष्टांत देत नवऱ्याने केलेली नथ साऱ्या जगाला सांगत सुटतात पण जी नथ घालण्यासाठी भगवंतांनी इतकं सुंदर नाक दिलं त्याची आठवण मात्र काढत नाहीत,पण भगवंताचे नाम किती गोड आहे. सांगत असताना अमृताहूनी गोड नाम तुझे देवा,जीवन जगत असताना आपला जीव विषयांमध्ये अडकतो त्यामुळे त्याचा अंत होतो,परंतू संत विषयांमध्ये न अडकल्यामुळे ते चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ते कायम स्मरणात राहणार आहेत,तसेच भगवंताच नाम अखंड राहणार आहे.हेच सांगत असताना कीर्तनकार हे समाज उध्दाराबरोबर आत्म उध्दार करुन समाज संस्कारक्षम बनवण्याची काम करतात आणि मनुष्याने गावची स्वच्छता केली पाहिजेच त्याच प्रमाणे मनाचीही स्वच्छता झाल्याशिवाय समाज सुधारणार नाही,अशी अनेक दृष्टांत देत जयवंत महारांजांनी कीर्तनात रंग भरला, सर्वं अन्नदाते यांचेही मनापासून अभिनंदन या चाललेल्या अखंड सप्ताहात शुक्रवारी सकाळी ६:००वा.समाधीसोहळा निमित्ताने पुष्पवृष्टी होऊन  साजरा होणार असून सर्व गजानन बप्पा भक्तमंडळींनी व करकंबकर भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,तसेच गजानन बाप्पांच्या पालखीची  नगर प्रदक्षिणा होऊन ह.भ.प.श्रीकांत महाराज आरोळे यांच्या काल्याच्या कीर्तनाचे सांगता होणार असून महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन सद्गुरू गजानन बप्पा महाराज भक्त मंडळींनी केले आहे श्रीकांत महाराज आरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये चंद्रकांत नगरकर, बाळासाहेब वास्ते, बाळासाहेब कुंभार,माऊली पिसे,सखाराम देशपांडे संतोष नगरकर,ओंकार व्यवहारे शुभम देशमुख, समाधान देशमुख,ज्ञानेश्वर दुधाणे, विद्या वास्ते, तसेच गजानन बप्पा भक्तमंडळी अधिक परिश्रम घेत आहेत