*मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत महाआरोग्य शिबिर* *लक्ष्मी टाकळीसह पंढरपूर शहर आणि ग्रामीण मधून अभूतपूर्व प्रतिसाद*

पंढरपूर /प्रतिनिधी
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त, पंढरीत महाआरोग्य आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. सोलापूर लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख महेश साठे आणि टाकळी गावचे उपसरपंच संजय साठे यांनी या महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन पंढरपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, जि.प.सदस्य वसंतराव देशमुख, माजी उपसभापती प्रशांत देशमुख, संभाजी ब्रिगेडचे दीपक वाडदेकर, जि.प.सदस्य रामदास ढोणे, टाकळीचे माजी सरपंच बापूसाहेब कदम, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, पंढरपूर आयएमएचे अध्यक्ष पंकज गायकवाड, निमाचे अध्यक्ष मनोज भायगुडे, याशिवाय पंढरपूर आणि परिसरातील अनेक डॉक्टर्स मंडळी उपस्थित होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळी येथे महाआरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात असंख्य नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला अनेक रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदानात भाग घेतला.या शिबिरास उपस्थित सर्वच मान्यवरांनी शिबिरास भरभरून शुभेच्छा दिल्या.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी
लक्ष्मी टाकळी येथील सरपंच विजयमाला वाळके,
उपसरपंच संजय साठे, ग्रा. पं.सदस्य औदुंबर ढोणे, नंदकुमार वाघमारे, महादेव पवार, सागर सोनवणे, रूपाली कारंडे, आशाबाई देवकते, रोहिणी साठे, रेश्मा साठे यांच्यासह मारुती धोत्रे, धनंजय बाबुराव बोरगावकर, ज्ञानू मारुती धोत्रे, नामदेव ज्ञानू धोत्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या उद्घाटनापासूनच नागरिकांनी तपासणीसाठी गर्दी केली होती. विविध तज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या करून घेत नागरिकांनी आपल्या आरोग्य समस्या सोडवल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समर्थ साठे, शुभम माने, प्रवीण माने, रोहन बचुटे, विनायक वरपे, ओम जाधव, अविष्कार माने, योगेश गायकवाड, किशोर नलावडे, अनिकेत जगदाळे, अमोल बंदपट्टे, तात्यासाहेब घाडगे, स्वप्निल पाटोळे, निखिल मगर, ओंकार देशमुख, कृष्णा साठे, रेहान पठाण यांचेसह साठे बंधूंवर प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
चौकट
या महाआरोग्य शिबिरात दंतरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, त्वचारोग, सर्जरी विभाग, बालरोग, हृदयरोग, रक्त व लघवी तपासणी यासह अनेक विभाग कार्यरत होते.
या शिबिरात डॉ. टकले, डॉ.सुजित जाधव, डॉ. महेश सपाटे, डॉ.उषा अवधूतराव, डॉ. अजित जाधव, डॉ. स्नेहा रोंगे, डॉ.स्वाती बोधले, डॉ. गिरनार गवळी, डॉ. प्रमोदराजे खंडागळे, डॉ. किरण मासाळ, डॉ. धीरज पाटील, डॉ. रोहित शिंदे, डॉ. मनोज भायगुडे, डॉ. आकाश रेपाळ, डॉ. प्रांजली शिंदे, डॉ. राहुल आठवले, डॉ. विजयालक्ष्मी हिरवे, डॉ. हिरवे, डॉ.अमित मेनकुदळे, डॉ. मिलिंद नकाते, डॉ. संदीप शेंडगे, डॉ. सोमनाथ शिंदे, डॉ. वाघ एन.डी., डॉ. आर. पी. वाडकर, डॉ. सुरवसे बि.डी., डॉ. गुरव एल. एम, डॉ. व्ही.आर. रणदिवे, डॉ. जाधव पी. ए., डॉ. ए. डी. कांबळे, डॉ. गुटाळ एम. एस., डॉ. शिंदे एस. वाय., डॉ.के.व्ही. मोरे, डॉ. सी. बी. सुर्वे, डॉ. एस. एन.उंबरे, डॉ. एम. व्ही. चोपडे, डॉ. आर. यु. काळे, डॉ.आर. बी.मोटे,
यांच्यासह तालुक्यातील अनेक आशा वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.