*करक॔ब येथे 'माझी वसुंधरा ' अभियान राबविण्याचा संकल्प*

प्रतिनिधी/ करकंब
पृथ्वी, जल, आकाश, वायू व अग्नी या पंचतत्वार आधारीत असणा-या 'माझी वसुंधरा अभियान' राबविण्याचा संकल्प बुधवारी झालेल्या सभेत करण्यात आला.
या अभियानाची सुरुवात जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन झाली. यावेळी करकंबचे उपसरपंच आदिनाथ देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नरसाप्पा देशमुख, सरपंच प्रतिनिधी अॅड. शरदचंद्र पांढरे, जिल्हा माहिती व्यवस्थापक व संवादतज्ञ सचिन जाधव, विस्तार अधिकारी उत्तमराव साखरे, ल. पा. चे स्थापत्य अभियंता बंडू कारंडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे जाधव, विस्तार अधिकारी मोहन मस्के, प्रा. सतिश देशमुख, सचिन शिंदे, अशोक जाधव, नागेश वंजारी, मुस्तफा बागवान, सुनिल मोहिते, महेंद्र शिंदे, दत्तात्रय खंदारे, संजय धोत्रे, ग्रामविकास अधिकारी डाॅ. सतिश चव्हाण, विजय मस्के, राजू शेटे, संजय खडके, फिरोजभाई बागवान इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे म्हणाले,' करकंब हे गांव मोठे असून या ठिकाणी 'माझी वसुंधरा' अभियानातून अनेक पर्यावरणपुरक उपक्रम राबवावेत. वृक्ष लागवड, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, अपारंपारिक ऊर्जा स्तोत्रांचा वापर, जलसंवर्धन, वनसंवर्धन, मृदूसंधारणाची कामे इत्यादी बरोबरच भुयारी गटारी, शोषखड्डे, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाण्याचा पुनर्वापर, सौर उर्जावर आधारीत पथदिवे, सेंद्रिय शेतीवर भर देणे, सुस्थितीत इमारती, गावरान व गावठाण जमीनींचा वापर इत्यादी गोष्टींवर भर देऊन हे अभियान राबविण्यात यावे.
सचिन जाधव यांनीही वरील विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
ग्रामविकास अधिकारी डाॅ. सतिश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.
चौकट-
माझी वसुंधरा' अभियानातून माझगाव माझं कुटुंब माझा आरोग्य या दृष्टिकोनातून प्रत्येकाने पुढाकार घेऊन आपल्या स्वतःच्या व गावच्या आरोग्य नीट राहण्यासाठी या योजनेत सर्व प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.
कार्यकारी अधिकारी शेळकंदे