*कल्याणराव काळे यांच्यासाठी अजूनही  संधीच!* *सहकार शिरोमणीतील हक्काचे अन् निष्ठावंत  सभासदामधूनही  विरोधकांची संख्या दुप्पट* *सक्षम विरोधक असल्याने यापुढे कारखान्याची प्रगती करणेच गरजेचे 

*कल्याणराव काळे यांच्यासाठी अजूनही  संधीच!*  *सहकार शिरोमणीतील हक्काचे अन् निष्ठावंत  सभासदामधूनही  विरोधकांची संख्या दुप्पट*  *सक्षम विरोधक असल्याने यापुढे कारखान्याची प्रगती करणेच गरजेचे 

पंढरपूर,/प्रतिनीधी 

पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी साखर कारखाना निवडणूक पार पडली. यामध्ये दुरंगी लढत होऊन,ही निवडणूक चांगलीच गाजावाजा करत चुरशीने पार पडली. यामध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेने या निवडणुकीत हक्काचे आणि निष्ठावंत सभासद असतानाही विरोधी मताची संख्या दुप्पट वाढली आहे. यामुळे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांच्यासह नवीन संचालक मंडळासाठी  सभासद यांनी दिलेली अखेरची संधी आहे. सध्या सक्षम विरोधकांची फौज समोर असल्याने यापुढील काळात कारखाना प्रगतीपदावर घेऊन जावे लागणार आहे.
   सहकार शिरोमणीचे स्थापनेपासून या कारखान्यावर काळे यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे मागील काळात हा कारखाना चांगला चालविला होता. या काही वर्षात अडचणीला सामोरे जावे लागत असल्याची आर्थिक परिस्थिती पहावयास मिळत आहे. हाच मुद्दा पकडून विरोधक गटाकडून या निवडणुकीत सभासदांची मने वळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला होता. मात्र स्व. वसंतराव काळे यांच्यापासून निष्ठेने काम करणारी मंडळी अजूनही कल्याणराव काळे यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. याचाच फायदा या निवडणुकीत काळे गटाला झाला आहे.

   मागील पंचवार्षिक निवडणुकीत ऍड दिपक पवार आणि डॉ रोंगे सर यांनी काळे यांच्या विरोधात स्वतंत्र पॅनल लढविले होते. विरोधात मतविभागणी होणार हे सभासद यांनी गृहीत धरून फारसा प्रतिसाद दिला नव्हता. या निवडणुकीत मात्र वरील दोघांनी एकत्रित येऊन विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक दुरंगी लढतीमध्ये लढविली गेली. यामुळे या निवडणुकीत विठ्ठल कारखाना विरुद्ध सहकार शिरोमणी कारखाना अशीच परिस्थिती पहावयास मिळाली. यामुळे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले होते. 
   मागील वर्षी पार पडलेल्या विठ्ठल चे निवडणुकीत वारसदार विठ्ठल परिवार विभागला होता. यामुळे पराभव झाला आहे. हेच हुकलेल गणित जुळवण्यासाठी या सहकार शिरोमणी चे निवडणुकीत कल्याणराव काळे, युवराज पाटील, भगीरथ भालके, गणेश पाटील यांनी एकत्रित येऊन प्रयोग करीत या निवडणुकीत विजय मिळविला आहे.
    विठ्ठलची विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यात चेअरमन अभिजीत पाटील यांनी प्रयत्न करून दाखविले आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही त्याचा परिणाम किती प्रमाणात जाणवेल याबाबत लक्ष वेधले जात होते.मात्र मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट मतदार काळे यांच्या विरोधात गेला आहे. एवढाच अभिजीत पाटील यांचा मोठा परिणाम झाला आहे.यामुळे हा विजय तसा पहिला तर सध्या निष्ठा  बेरजेत नाही तर वाजाबकित गेली आहे. याचे काळे गटाने आत्मपरीक्षण करणे आवश्यक असून यापुढील काळात तरी हा कारखाना प्रगतीकडे घेऊन जाणे गरजेचे आहे. हा संदेश या निवडणुकीत एकूण सभासद यांनी दिला असून ही काळे यांच्यासाठी अखेरची संधी आहे.

*चौकट*

या निवडणुकीत  विठ्ठलचे निवडणुकीत मतभेद झालेली वारसदार नेते मंडळी एकत्रित आली आहेत. त्याचा फायदाही झाला आहे. त्यामुळे त्या चारही जणांनी आता तालुक्याच्या राजकारणात आम्ही एकत्रित राहणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र या सहकार शिरोमणीचे निवडणुकीत विरोधी पॅनल मधून अभिजीत पाटील यांच्या बरोबर आघाडी केलेले ऍड दिपक पवार यांची भूमिका या निवडणुकीपूरतीच होती की, यापुढील राजकारणातही राहणार आहे. हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. विठ्ठल कारखान्यात डॉ रोंगे हे मार्गदर्शक ची भूमिका पार पाडत असल्याने ते मात्र चेअरमन अभिजीत पाटील यांच्या सोबतच असणार हे मात्र नक्की आहे. यामुळे यापुढील या तालुक्यातील राजकीय परिस्थिती कोणत्या दिशेने असणार आहे. हे आगामी काळातच समजणार आहे. हे मात्र नक्की..