*करकंब गावासाठी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत फक्त पण 82 घरकुले मंजूर-विरोधी पक्ष नेते राहुल पुरवत.* *गोलमाल है सब गोलमाल है..... ये पब्लिक है अंदर क्या है बाहर क्या है... ये सब कुछ जानती .....!*

*करकंब /प्रतिनिधी*:
पंढरपूर तालुक्यातील सर्वात लोकसंख्येचे मोठे गाव म्हणून करकंब सुपरिचित आहे. या करकंब गावात अठरापगड जाती जमातीतील बहुसंख्येने समाज वास्तव्य करीत असून आजही या सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावामध्ये अनेक लाभार्थी वंचित आहेत. सध्या प्रधानमंत्री आवास योजना 2021-22 पंढरपूर तालुक्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत निहाय प्राप्त उद्दिष्ट असलेली यादी (क) वर्गामध्ये1909 प्रतीक्षा यादीत असून प्रत्यक्षात मात्र या सर्वात मोठ्या लोकसंख्येचे व अठरापगड समाजातील गाव करकंब असूनही या योजनेअंतर्गत करकंब गावासाठी फक्त 82 घरकुले मंजूर झालेली आहेत. यामध्ये एस .सी.(अनुसूचित जाती जमाती), एस .टी. यासाठी 58 घरकुल तर ओपन वर्गासाठी 24 घरकुले मंजूर आहेत. अशी माहिती करकंब ग्रामपंचायतचे विरोधी पक्षनेते व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल काका पुरवत यांनी दिली. गेल्या पंधरा ते महिन्याभरापासून करकंब साठी दोन हजार घरकुले मंजूर झाली याची चर्चा जोरात होत असल्याने प्रत्येक जण घरकुलासाठी आपापल्या परीने धावपळ करीत आहे. या 1900 जणांमध्ये या प्रतीक्षेत यादीत पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल योजनेत आपला कसा नंबर लागेल हे या तयारीत असताना गावात मात्र वेगळे चित्र दिसून येत आहे. प्रतीक्षा यादी 1900 जणांची, करकंब साठी फक्त 82 जणांची घरकुल लाभार्थी मंजूर असल्याने हे सब गोलमाल है... गोलमाल है.... अशी कुजबूज लोकांमधून ऐकावयास मिळत आहे. शेवटी काय ये पब्लिक है... अंदर क्या है... बाहर क्या है... ये सब कुछ जानती है....!*
*चौकट:
पंढरपूर तालुक्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना 2021-22 ग्रामपंचायत निहाय प्राप्त उद्दिष्ट प्राप्तीसाठी पंढरपूर तालुक्यात 733 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेली आहेत. यामध्ये करकंब ग्रामपंचायत साठी 82 घरकुल मंजूर केले चा समावेश आहे.*