गादेगाव येथील कोविड सेंटरला  आमदार समाधान आवताडे यांची भेट !   त्याच  कोविड सेंटरला केली 21 हजार रुपयांची रोखच  मदत 

गादेगाव येथील कोविड सेंटरला  आमदार समाधान आवताडे यांची भेट !    त्याच  कोविड सेंटरला केली 21 हजार रुपयांची रोखच  मदत 

 पंढरपूर /प्रतिनिधी

पंढरपुर तालुक्यातील 
 गादेगाव येथील    उभारलेल्या  कोविड सेंटरला    असलेले पंढरपुर मंगळवेढा मतदार संघाचे नूतन लोकप्रिय आमदार समाधानदादा अवताडे यांनी भेट दिली. याच कोविड सेंटरला रोख रक्कम 21000 रुपयांची  मदत केली .
  या भेटीदरम्यान गावातील अडीअडचणी जाणून घेतल्या सर्व परिस्थितीचा आढावा घेत, सामाजिक समाजसेवक दत्ता बागल उर्फ डी बिल्डर यांच्या कार्याची प्रशंसा केली. कोविड सेंटर मधील स्वच्छता व परिसरातील स्वच्छता यावर समाधान व्यक्त केले.दत्ता बागल उर्फ डी बिल्डर ग्रुप ने अशीच सामाजिक कामे करावीत त्यांच्या पाठीमागे आम्ही खंभिर पणे उभा राहू असे अस्वासनही आमदार समाधानदादा आवताडे यांनी यावेळी दिले.
       यावर प्रतिक्रिया देताना समाजसेवक दत्ता बागल म्हणाले की भविष्य काळातील गादेगावतील वृक्षारोपण करणे. गावात अनाथ,अंध अपंग लोकांना निराधार लोकांना घरकुल मिळवून  देणे तसेच शासकीय अनुदान मिळवून देणे.
गावात सामुदायिक विवाह सोहळा घेणार.
माननीय आमदार समाधान दादा अवताडे यांनी covid सेंटर ल भेट दिली याबद्दल त्यांचे आभार मानले. 
यावेळी  सदगुरू साखर कारखान्याचे संचालक  मोहनआप्पा बागल गादेगावचे माजी सरपंच महादेवआण्णा बागल ग्रामपंचायत च्या सरपंच ज्योतीताई बाबर ग्रामपंचायत सदस्य महादेव फाटे शिवरत्न चे अध्यक्ष गणपत मोरे मनसे चे अध्यक्ष अनिल आप्पा बागल, शांतीनाथ बागल एलआयसी, विकास बागलसाहेब, सामाजिक कार्यकर्ते संदीप कळसुले युवा नेते गणेश फाटे, स्वागत फाटे व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.