*करकंब- पंढरपूर रस्त्यावर दूध टँकरच्या धडकेत... वारकऱ्यांचा छोटा  हत्ती पलटी...!* *दोन वारकरी गंभीर जखमी तर अन्य वारकऱ्यांवर उपचार सुरू*.

*करकंब- पंढरपूर रस्त्यावर दूध टँकरच्या धडकेत... वारकऱ्यांचा छोटा  हत्ती पलटी...!* *दोन वारकरी गंभीर जखमी तर अन्य वारकऱ्यांवर उपचार सुरू*.

करकंब /प्रतिनिधी:-

पंढरपूरची वारी करून माघारी  जात असताना कर याच्या छोटा हत्ती या वाहनाला सोनाई दूध टँकर एम एच 42 ए क्यू 6037 या टँकरने धडक दिल्याने दिलेल्या या धडकेत वीस वारकरी जखमी झाले असून यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून सात ते आठ जण किरकोळ जखमी असून अन्य वारकरी ही उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. सदर अन्य दोन गंभीर जखमींना पंढरपूर येथील सुरुवातीस उपजिल्हा रुग्णालय दाखल केले असता त्यांना अत्यावश्यक उपचारासाठी तातडीने पंढरपूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. सदरचे जखमी हे लक्ष्मी नगर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहेत. तर काहीं वारकऱ्यांना सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून संबंधित वारकऱ्यांच्या अपघाताची घटना कळताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या घटनेची माहिती घेऊन संबंधित प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश तारु यांना योग्य त्यासंबंधी सूचना दिल्या. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु यांनी अपघात पथक घटनास्थळी जाऊन संबंधित  गंभीर जखमी वारकऱ्यांना  तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करून उपचारासाठी दाखल केले. व पलटी झालेला वारकऱ्यांचा छोटा हत्ती ग्रामस्थांच्या मदतीने उभा करून  वाहतूक सुरळीत केली. वारकऱ्यांच्या वाहनाला धडक दिलेल्या सोनाई दूध टँकर एम एच 42ए क्यू 6037 हा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.