*महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या भोसे येथील सर्व संशयित आरोपीला करकंब पोलिसांनी केली अटक* *करकंब पोलिसांनी केली अटक*

*महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या भोसे येथील सर्व संशयित आरोपीला करकंब पोलिसांनी केली अटक*     *करकंब पोलिसांनी केली अटक*


करकंब/प्रतिनिधी

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व विनायक सूर्यकांत लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार टेम्भुर्णी येथील अश्विनी चा दिनांक 09/02/2019 रोजी भोसे येथील प्रकाश घोडके याचबरोबर विवाह झाला होता.मात्र फिर्यादीच्या जबाबानुसार अश्विनी घोडके हिस लग्न झालेनंतर सहा महिन्यांपासून तिचा पती प्रकाश गोरख घोडके व तिची सासू रुक्मिणी उर्फ बाळाबाई गोरख घोडके सतत त्रास देत होती हा त्रास होत असल्याचे मयत अश्विनी हिने फिर्यादी असलेले तिचे भाऊ व तिचे चुलत भाऊ यांना मोबाईल वरून ही माहिती कळविली होती.तिचा पती प्रकाश गोरख घोडके याने मयत अश्विनी हिस माहेरी म्हणजे फिर्यादीच्या घरी आणून सोडले होते.नंतर मयत अश्विनी ची नणंद हिने वाद मिटवामिटवी करून मयत अश्विनी हिस तिचे पती प्रकाश गोरख घोडके रा.भोसे येथे पुन्हा आणुन सोडले होते.मात्र पुन्हा घरकाम वरून मयत आश्विनस त्रास दिला जात होता. नंतर दि.24/06/2022 रोजी अश्विनी च्या पतीने फोन करून सांगितले की अश्विनी हिस वरदविनायक हॉस्पिटल पंढरपूर मध्ये ऍडमिट केले आहे.नंतर अश्विनी ची आई पंढरपूर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन अश्विनीस बघून आली.नंतर अश्विनी च्या नणंदेच्या पतीने फोन करून सांगितले की अश्विनीस सोलापूर शासकीय रुग्णालयात ऍडमिट केले आहे.नंतर आम्ही अश्विनीची आई,मी(फिर्यादी)सोलापूर ला दवाखान्यात पहायला गेलो असता तिचा पती प्रकाश गोरख घोडके याने सांगितले की अश्विनीने डाळिंबावर फवारणी करण्याचे औषध प्राशन केले आहे,तिची प्रकृती गंभीर आहे नंतर दि.26/06/2022 पहाटे 02:30 फोन आला की,तुमची बहीण अश्विनी ही मयत झाली आहे.अश्विनी च्या मृत्यूस कारणीभूत तिचा पती प्रकाश गोरख घोडके व सासू रुक्मिणी उर्फ बाळाबाई गोरख घोडके रा.घोडके वस्ती भोसे असल्याची फिर्याद करकंब पोलिसांत दाखल झाल्यानंतर या घटनेचे गांभीर्य ओळखत स.पो नि. निलेश तारू यांच्या मार्गदर्शनाखाली  पी.एस.आय.अजित मोरे यांनी प्रत्येक घटनाक्रम लक्षात घेत तपासाची चक्रे अत्यंत वेगाने फिरवत या गुन्ह्यातील सर्वच्या सर्व संशयित आरोपींना   306,498 अ,323,34 प्रमाणे अटक केली आहे.पुढील तपास करकंब पोलीस स्टेशन सपोनि निलेश तारू यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस स्टेशन चे पीएसआय अजितकुमार मोरे हे करीत आहेत.