*खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी आमदार शिंदे बंधूंची जोरदार फिल्डिंग !* *माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे बैठकीत मोठ मताधिक्य देण्याचा केला निर्धार*

*खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी आमदार शिंदे बंधूंची जोरदार फिल्डिंग !*  *माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे बैठकीत मोठ मताधिक्य देण्याचा केला निर्धार*

पंढरपूर/प्रतिनीधी

माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे आणि आ. संजयमामा शिंदे यांनी जोरदार  फिल्डिंग लावली आहे. यासाठी खा निंबाळकर यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यातील प्रत्येक गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांची ओळख करून देण्यात आली.

 माढा तालुक्यातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे वतीने पिंपळनेर येथे मंगळवारी दिवसभर बैठक आयोजित करण्यात आली होती.     या बैठकीत आ. बबनदादा शिंदे यांनी मोठ्या मताधिक्याने निंबाळकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
 या मेळाव्यास माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर निष्ठा असलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक यांनी तालुक्यातील गावनिहाय प्रचार यंत्रणा राबविण्याबाबत खासदार निंबाळकर यांच्याशी संवाद साधला.
    या बैठकीस आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, माजी जि.प. सदस्य शिवाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब नाना देशमुख, बंडू नाना ढवळे, जिल्हा दुध संघाचे चेअरमन रणजीतसिंह शिंदे, संभाजी पाटील,
अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शब्बीर जहागीरदार, भाजपा माढा तालुका अध्यक्ष बाबाराजे बोबडे, संजय पाटील भीमा नगरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष अनुभुले, धनंजय मोरे, रमेश पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. खासदार निंबाळकर यांनी प्रत्येक गावनिहाय समस्या प्रश्न समजावून घेत मतदारांशी संवाद साधताना दिसून आले.

  चौकट

*दोन लाखाचे मताधिक्य देण्यावर ठाम*

माढा लोकसभा मतदार संघातून महायुतीचा धर्म आम्ही पाळणार असून या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार खा रणजितसिंह निंबाळकर यांना कमीत कमी दोन लाखाचे मताधिक्य नक्की मिळेल असेही आ. बबनदादा शिंदे यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे मताधिक्य देण्यावर अजूनही ठामच असल्याचे दिसून आले.