*पुंडलिकाच्या भेटीला विठ्ठलच !* *राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी केली दळवींची जिल्हाध्यक्षपदी पुर्ननियुक्ती*

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उद्योग व व्यापार विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून आज सावंतवाडी तालुक्याचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी नागेश फाटे यांचं सावंतवाडी तालुक्यात स्वागत केले. जिल्हा उद्योग व व्यापार सेलच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, उद्योग व व्यापार सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी पुंडलिक दळवी यांची पुर्ननियुक्ती करण्यात आली. पुंडलिक दळवी यांनी गेल्या वर्षभरात या पदावर काम करत असताना पक्षवाढीसाठी मेहनत घेतली.त्यामुळेच आज त्यांची जाग्यावर नियुक्ती करण्यात आली असून ते पहिलेचं असे जिल्हाध्यक्ष आहेत अशा शब्दांत पुंडलिक दळवी यांच्यावर राज्याचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी कौतुकाचा वर्षाव केला. सावंतवाडीत येथील कार्यक्रमात ते बोलत होते. तर पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची प्रतिकृती भेट देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उद्योग व सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी पुंडलिक दळवी यांची पुर्ननियुक्ती करण्यात अल्यानं सर्वच स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात आल.यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उद्योग व व्यापार सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काका कुडाळकर, भास्कर परब, शिवदत्त घोगळे, श्री. सराफदार, शफिक खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, रिया भांबुरे, सावली पाटकर, जहिरा ख्वाजा, अशोक पवार, बावतीस फर्नांडिस, शैलेश लाड, असलम खतिब, राजू धारपवार, इफ्तिकार राजगुरू, नवीन गांवकर, नवल साटेलकर, आसिफ ख्वाजा, याकुब शेख, नियाज शेख, सिद्धेश तेंडोलकर आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.