*बार्डी ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची.* *सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरपारची लढाई....!* *एका सरपंच जागेसाठी सात अर्ज दाखल.

*बार्डी ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची.*  *सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरपारची लढाई....!*  *एका सरपंच जागेसाठी सात अर्ज दाखल.

करकंब /प्रतिनिधी

 :- पंढरपूर तालुक्यातील बार्डी, खेड भोसे ,खरातवाडी, मेंढापूर, नेमतवाडी, व्होळे या ग्रामपंचायतीची निवडणूक लागली असली तरी सध्या पंढरपूर सह सोलापूर जिल्ह्यात बार्डी ग्रामपंचायत च्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बार्डी
सरपंच पदाच्या एका जागेसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बार्डी ग्रामपंचायत चे तीन वार्ड असून ग्रामपंचायत सदस्य संख्या 10 आहे .यासाठी 41 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.
निवडणुकीपूर्वीच बारडी मध्ये
निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून ग्रामपंचायत निवडणूक प्रचंड अटीतटीची व रस्सीखेच असलेली सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरपारची लढाई  येत्या काही दिवसात पहावयास मिळणार आहे. बार्डी मधील दोन्हीही पॅनलच्या वतीने प्रचंड जोर लावत असून अठराशे मतदान असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत एक दिवसाचा राजा..... असलेला मतदार...कोणाच्या पारड्यात कौल देणार याकडे राजकीय तज्ञांचे ही लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात लक्षवेधी ठरणार असल्याचे व्यक्त केले जात आहे.