*पंढरीतील समृद्धी टॅक्टर्समध्ये सोनलिकाचा वर्धापनदिन साजरा* *लकी ड्रॉचे वितरण संपन्न*

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूरातील नामांकित असलेल्या समृद्धी ट्रॅक्टर्समध्ये सोनालिका कंपनीच्या २५ वा वर्धापनदिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यानिमित्ताने शेतकरी ग्राहक लकी ड्रॉचे बक्षीस वितरण करण्यात आले. आणि या वर्धापनदिनी विजेत्या शेतकरी बांधवांचा आनंद द्विगुणित करण्यात आला .
समृद्धी ट्रॅक्टर्स द्वारा खोलण्यात आलेल्या लकी ड्रॉ मधील विजेत्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला .आप्पासो भागवत गायकवाड उंबरगाव, (फ्रीज) सिद्धेश्वर कोंडीबा कांबळे गुंजेगाव (मोबाईल) , पवन आदिनाथ चौघुले भाळवणी (कपल वॉच) ,पांडुरंग बाबुराव मिसाळ गार्डी-(कपल वॉच), सुभाष जनार्दन सुरवसे वाखरी (मिक्सर), समाधान निवृत्ती इमडे सावे -(फॅन) ,ईश्वर मारुती दळवी गार्डी -(डिनर सेट) , मधुकर कोंडीबा खुनस्कर कासेगाव-( डिनर सेट) ,अशा आकर्षक भेट वस्तू धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना देण्यात आल्या.
पंढरपूर तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून, शेतकरी हा समृद्धीमय व्हावा आणि त्यामधून शेतकऱ्यांचे अर्थकारण समृद्ध व्हावे हा हेतू असून शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात समृद्धी ट्रॅक्टर नेहमी कार्यरत असते, असे मत अभाजीत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक अभिजीत कदम, सुस्तेचे अनिलकाका घाडगे, सुरेश सावंत, मॅनेजर सोमनाथ केसकर, सोनालिका कंपनीचे साहिल शिंगला सर, सुरेंद्र ठाकूर सर आदी मान्यवर उपस्थित होते.