*सरकोली वाळू उपसा प्रकरणी धरणे आंदोलनाचा इशारा* *आम आदमीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी दिले निवेदन*
पंढरपूर,प्रतिनीधी
पंढरपूर तालुक्यातील भीमा आणि मान नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा सुरूच आहे. सरकोली याठिकाणी मोठा उपसा सुरू असून तो बंद न झाल्यास येत्या दहा दिवसात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत गुरुवारी तहसील कार्यालयाकडे आम आदमीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी रीतसर निवेदनही दिले आहे.
सरकोली हे गाव भीमा आणि मान या दोन नदीचा संगम असणारे गाव आहे. या गावातून बेकायदेशीर वाळू उपसा करणारे गाव म्हणून ओळख वाढली आहे. या ठिकाणी महसूल विभाग आणि पोलीस विभाग यांनी कारवाईची मलमपट्टी केली आहे. या कारवाईचा प्रभाव वाळू तस्कर करणारे लोकावर पडला नाही. यामुळेच राजरोसपणे या सरकोली गावातील लोकाकडूंच वाळू उपसा केला जात आहे.
यापूर्वीही आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी १२जानेवारी २०२३
आणि २८ फेब्रुवारी २०२३ रोजी याबाबत निवेदन दिले होते. याची दखल घेतली नसल्याने,आता येत्या २९ मे रोजी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत प्रांत अधिकारी पंढरपूर आणि पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांना माहितीसाठी निवेदन दिले आहे. त्यामुळे दोन दिवसात हा वाळू उपसा बंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे.