*दि. पंढरपूर मर्चंट बँक विकास आघाडीची प्रचारात आघाडी.* - *दि. पंढरपूर मर्चंट को.ऑप.बँक लि. पंढरपूर निवडणूक.* *करकंब येथे मर्चंट बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारात काका विरुद्ध पुतण्यांची प्रचारात जोरदार एन्ट्री....!*

करकंब(प्रतिनिधी) :-
पंढरपूर मर्चंट बँक विकास आघाडी या गटाच्या पंढरपूर बँकेच्या सन 2022 - 23 ते 2027-28 या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोठी आघाडी घेत आता होम टू होम प्रचाराची सुरुवात केली आहे. यावेळी व्यापारी, ज्येष्ठ नागरिक तसेच युवकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. या पंढरपूर मर्चंट बँकेच्या निवडणुकीमध्ये करकंब येथे स्थानिक उमेदवार असल्यामुळे या विकास आघाडी पॅनलच्या प्रचारार्थ प्राध्यापक सतीश देशमुख यांनी जोरदार एन्ट्री घेतली असून ही निवडणूक काका विरुद्ध पुतण्यांची लढाई असे समीकरण निर्माण झाल्याने प्रचंड रस्सीखेच निर्माण झाली आहे. विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी सभासदांच्या गाठीभेटी घेऊन होम टू होम प्रचार करण्यावरती सध्या भर दिला आहे. त्यामुळे सध्या तरी प्रचारात विकास आघाडी पॅनलने मुसंडी मारल्याचे दिसत आहे.
करकंब येथील भजलिंग महाराज मठात प्रचाराचा नारळ फोडून संपूर्ण गावातून व्यापारी, जेष्ठ नागरिक तसेच प्रत्येक सभासदांच्या गाठी - भेटी घेऊन प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक- नरसाप्पा देशमुख, मा. सरपंच दिलीपनाना पुरवत,आदिनाथ देवकते, प्रा.सतीश देशमुख, राजू पवार, संजय भिंगे, वैभव शेटे ,संतोष परमणे ,जितेंद्र करांडे, अक्षय आंबरे, नितीन गांधी, धनंजय मेनकुदळे, प्रशांत म्हमाणे, सोमेश्वर विरपे, विनोद परचंडे यांच्यासह गावातील युवकांनीही मोठा सहभाग नोंदवत प्रचार हायटेक केला आहे.विरोधी गटात गावातील स्थानिक उमेदवार असूनही पंढरपूर मर्चंट बँक विकास आघाडी पॅनल ने मोठ्या प्रमाणात प्रचारात आघाडी घेत आहे. त्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
दि पंढरपूर मर्चन्डस बँक विकास आघाडी पॅनलचे उमेदवार आंबरे सोमनाथ सिद्धेश्वर, भादुले भगवान वसंतराव, भिंगे भारत शिवदास,डोंबे राजेंद्र बसवेश्वर, गांधी राजकुमार प्रतापचंद,घाडगे किरण शंकर,मेणकुदळे अतुल शशीकांत,म्हमाने राहुल अशोक,पाटील युवराज अशोकराव, शेटे आनंद मुनिआप्पा,सौ.गांधी सुनंदा पदमकुमार,सौ.परचंडराव लक्ष्मी वसंतराव, जवंजाळ संजय विठ्ठल,गोसावी राजेंद्र गुलाबगिर या उमेदवारांचे चिन्ह कपबशी असून बँकेच्या हिताच्या निर्णयासाठी पॅनल ला निवडून देण्याचे आव्हान केले आहे.