*आ. समाधान अवताडे यांच्या पाठपुराव्यास अल्पावधीत मोठे यश*  *पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील मोठ्या कामाचे भूमिपूजन होणार शाही थाटात*  *कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेसह मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यांची राहणार उपस्थिती*

*आ. समाधान अवताडे यांच्या पाठपुराव्यास अल्पावधीत मोठे यश*   *पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील मोठ्या कामाचे भूमिपूजन होणार शाही थाटात*   *कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेसह मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यांची राहणार उपस्थिती*

पंढरपूर /प्रतिनिधी 

 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यतत्पर आमदार समाधानदादा अवताडे यांनी अल्पावधीतच आपल्या मतदारसंघांमध्ये करोडो रुपयाचा विकास निधी मंजूर करून आणला आहे. यापैकी काही कामांचा भूमिपूजन सोहळा सोमवार  दि 7 ऑक्टोंबर रोजी दुपारी मतदार संघामध्ये पार पडणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी  राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण, जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड, उद्योग मंत्री ना.उदय सामंत, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे,याचेसह वरील उपस्थित  मंत्र्यांच्या विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सह सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील  विविध  विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रम सोमवारी दुपारी होणार आहे.या कुठच्यावधी रुपयाच्या   कार्यक्रमामध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन सोहळा, तामदर्डी बंधाऱ्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा. मंद्रूप, निम्बर्गी, भंडारकवठे , कर्जाळ- कत्राळ, हुलजंती,पौट, मरीआई चौक, निंबोनी, गोणेवाडी, लेंडवे चिंचाळे,ते रा. म. 166ला जोडणारा पर्याय रस्ता करणे. या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा.
 कासेगाव तालुका पंढरपूर औद्योगिक विकास केंद्र (एम.आय. डी.सी.)जाहीर करण्याची घोषणाकरण्यात येणार आहे. वरील सर्व कार्यक्रम आंधळगाव ते लक्ष्मी दहिवडी रोड याठिकाणी दुपारी 2:30 वाजता उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,तर पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे. असे आवाहन आ. समाधान आवताडे यांनी केले आहे.
    
*चौकट*

*आ.समाधान आवताडे यांनी मार्गी लावले महत्वाचे प्रश्न*
--------------------------

 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे  आमदार समाधान आवताडे यांनी, आपल्या अल्पावधीत असलेल्या कार्यकाळातही, मतदारसंघातील मूलभूत गरजा पूर्ण करीत असताना दुसरेही गरजेचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.
   पंढरपूरची आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी कोट्यावधीचा निधी, विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून दर्शन मंडप मंजूर करण्यात आला आहे. पंढरपूर शहरासाठी महत्त्वकांक्षी असलेला मलनि:सारण प्रकल्प, कॉटेज हॉस्पिटल  200 बेडचे काम पूर्ण,तसेच 1हजार बेडच्या हॉस्पिटलला मंजुरी तर  निंबोनी याठिकाणी ग्रामीण रुग्णालयास मंजुरी. पंढरपूर शहरातील सर्वात मोठी  गोष्ट म्हणजे सर्व शासकीय कार्यालय एकाच प्रशासकीय इमारतीमध्ये घेण्याचा इमारतीच्या निधीसाठी मंजुरी. असे अनेक कामासाठी मोठा पाठपुरावा करून अल्प काळात आपले कर्तव्य पार पाडले आहे.