*आजोती येथील विविध विकासकामांना सुरुवात* *युवा नेते रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ*

करकब/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील आजोती येथील विविध विकासकामांना सुरुवात करण्यात आली.
गुरुवारी या विकासकामांचा शुभारंभ, माढा तालुक्याचे युवा नेते रणजीतभैया शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश पाटील ,विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण, यांचेसह आजोती गावचे माजी उपसरपंच अमरजीत पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यातील आजोती गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ, गुरुवार दि. ९ डिसेंबर रोजी करण्यात आला. माढा तालुक्याचे युवा नेते रणजीत (भैया) शिंदे यांच्या शुभहस्ते,या कामांचे भूमिपूजन करण्यात आले .आजोती ते होळे रस्ता , आजोती गावठाणातील कॉक्रीट रस्ता ,तसेच दलित वस्ती मधील कॉंक्रीट रस्ता इत्यादी कामांचा शुभारंभ नुकताच पार पडला. जिल्हा परिषद सेस फंडातून १० लाख रुपयांचा आजोती ते होळे रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. गावठाण रस्त्यासाठी १० लाख रुपये तर दलित वस्ती मधील कॉंक्रीट रस्त्यासाठी २ लाख रुपये देण्यात आले आहेत. एकंदरीत २३ लाख रुपयांच्या विकासकामांना आजोती गावामध्ये सुरुवात झाली असल्याची , माहिती गावचे माजी सरपंच अमरजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील पुनर्वसन गावठाण आजोती गावात आणखी काही विकास कामे करावयाची आहेत .यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या दोन खोल्यांसाठी २३ लाख रुपये तर, आ. बबनदादा शिंदे यांच्या आमदार फंडातून १० लाख रुपयांची युवकांसाठीची व्यायाम शाळा, तसेच जनसुविधा योजनेतून १० लाख रुपयांचा गाव पोहोच रस्ता इत्यादी विकासकामे मंजूर झाली असल्याची माहितीही अमरजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.लवकरच याही कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.
गुरुवारी येथील २३ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ, युवा नेते रणजित भैया शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे . यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता कांबळे साहेब, कनिष्ठ अभियंता कपिले साहेब, ग्रामसेवक श्रीमती लिगाडे मॅडम यांचेसह , आजोती गावचे सरपंच सचिन देडगे, उपसरपंच प्रशांत गुठाळ, होळे गावचे सरपंच
तानाजी भुसनर, माजी सरपंच भीमराव आप्पा होळकर, उपसरपंच गणेश गावडे, पंकज कण्हेरकर, गुरुदास गुटाळ ,सुभाष साळुंखे ,जालिंदर साळुंखे ,नागेश उपासे ,तुकाराम शिंदे, गणेश मोरे, विठ्ठल खडके ,अण्णासाहेब पाटील ,नागेश चव्हाण ,बबन मिसकर, शुभम गुटाळ, बबलू पवार ,शिवाजी साळुंखे ,सुब्राव गुटाळ ,चंदु रोकडे आदींसह आजोती गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.