*भाजपला आधार देण्यासाठी शिवसेना सज्ज* *आ. सातपुते यांच्या विजयासाठी संपर्कप्रमुख महेश साठे यांनी बोलावली बैठक*

पंढरपूर /प्रतिनीधी
सोलापूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आ. राम सातपुते यांना विजयी करण्यासाठी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी शिवसेना शिंदे गट सज्ज झाली आहे. यासाठी सोलापूर लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख महेश साठे यांनी आपल्या निवासस्थानी आ. राम सातपुते यांचे उपस्थितीत बैठक बोलावली होती. यामध्ये महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
शिवसेना पक्षाच्या वतीने साठे यांच्या लक्ष्मी टाकळी पंढरपूर येथील निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यामध्ये महेश साठे यांनी आपल्या भाषणात 2014 पासून ते 2024 पर्यंत सातत्याने पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघातून बीजेपीचे उमेदवार यांना आजपर्यंत मताधिक्य दिलेले आहे .त्या पेक्षाही अधिकची मताधिक्य या निवडणुकीत नक्कीच आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
बीजेपीच्या उमेदवाराच्या खांद्याला खांदा लावून आम्ही स्वतः उमेदवार समजून जीवाचे रान करून काम करून अधिकचा लीड देऊ असे आश्वासन सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महेश साठे यांनी उमेदवार राम सातपुते यांना दिले.
यावेळी राम सातपुते यांनी आपल्या भाषणात महायुतीतील मित्र पक्षांचा माझ्याकडून सन्मान राखला जाईल. त्याचबरोबर निधीच्या किंवा विकास कामाच्या बाबतीमध्ये सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल.भाजपच्या पदाधिकाऱ्यां बरोबरच सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल .असे अभिवचन यावेळी राम सातपुते यांनी दिले. विकासाच्या बाबतीमध्ये देखील आपल्या सोलापूर लोकसभेच्या विकासाच्या बाबतीत देखील मी कुठेही कमी पडणार नाही .मी एक सर्वसामान्य ऊसतोड कामगारांचा मुलगा असून,आज कष्टातून व स्वकर्तृत्वातून या ठिकाणी पोचलो आहे .म्हणून मला सर्वसामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत ,काय समस्या आहेत, मी जवळून पाहिलेले आहेत. त्यामुळे नक्कीच मी चांगल्या पद्धतीने जनतेची सेवा करू शकतो. मला त्याची आवड आहे. असे देखील यावेळी त्यांनी बोलून दाखविले.या कार्यक्रमास जवळपास 300 कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीस उपस्थित शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये महिला आघाडीचे संपर्क प्रमुख अनिताताई माळगे,, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील , महिला जिल्हाप्रमुख मुबिना मुलानी, आरती बसवंती,दिलीपभाऊ कोल्हें , युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख प्रियंका परांडे , उमेश गायकवाड, दादासाहेब पवार, संतोष जाधव सर, शिवाजी बाबर, मुक्ताताई खंदारे, यास्मिन पठाण, स्वामी मॅडम, महेश ताठे ,महादेव भोसले ,सरपंच संजय साठे, ग्रामपंचायत सदस्य नागरबाई साठे, रेश्मा साठे, रोहिणी साठे, पवार मॅडम, जाधव मॅडम, प्रीतम जाधव, सरपंच विक्रम आसबे, विकी मेटकरी, शुभम लकेरी संजय सरवले भाऊ कदम यांचेसह इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते .