*अभयसिंह जगताप यांनाच उमेदवारी द्या* *प्रदेश पातळीवरील राष्ट्रवादी युवक पदाधिकारी यांचा आगृह*! *प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील अनुकूल*

पंढरपूर/प्रतिनीधी
माढा लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अभयसिंह जगताप यांनाच उमेदवारी द्यावी. आशी मागणी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे प्रदेश पातळीवरील युवक राष्ट्रवादी काँगेसकडून आगृह धरण्यात आला आहे. यामध्ये पाटीलही अनुकूल असल्याने जगताप यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
महाराष्ट्रातील युवकांना संधी देणारा पक्ष म्हणून आपल्या पक्षाची ओळख असून,प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना गेली बरीच वर्षे काम करीत असलेले अभयसिंह जगताप यांनाच माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळण्यासाठी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना निवेदन देण्यात आले .
या आगृही भूमिकेमध्ये राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद बागल, प्रदेश सरचिटणीस राजू जानकर, रोजगार व स्वंयरोजगार राज्य समन्वयक प्रा नारायण खरजे तसेच यावेळी अमित घोरपडे, निखिल सूर्यवंशी,
राहुल पिसाळ, नितीन त्रिमुखे, सुजित जानकर यांचे शिष्टमंडळ आणि पदाधिकारी उपस्थित होते.
गेली बरीच वर्षे तळागळात पक्ष संघटनेचे अभयसिंह जगताप हे भरीव कार्य करीत असून, एक उच्चशिक्षित प्रामाणिक एकनिष्ठ आणि सर्व समाजातील घटकांना सामावून घेणारा एक युवा चेहरा आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात वाढती लोकप्रियता पाहता लोकांनी अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीसाठी जोर धरला असून संघटनेत एक तन मन धनाने काम करणारा एक तरुण तरुण चेहरा लोकसभेत जावा .अशी आग्रहाची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि शिष्टमंडळ यांनी केली आहे. जयंतराव पाटील यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता अभयसिंह जगताप यांनाच तुतारी मिळणार असल्याचे चिन्ह वाढू लागली आहे.