*पराभवाची हॅट्रिक टाळण्यासाठी आ. प्रणिती शिंदे यांचेकडून मोठी सतर्कता* *खा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील सहानुभूतीने मिळतेय मोठ बळ* *विस्कटलेली घडी परत बसविण्यात मोठे यश*

पंढरपूर/प्रतिनीधी
मागील लोकसभेच्या निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदार संघातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोदी लाटेत पराभव झाला होता . त्यामुळे आता तिसऱ्यांदा धोका निर्माण होवून,पराभवाची हॅट्रिक होवू नये यासाठी आ. प्रणिती शिंदे यांचेकडून मोठी सतर्कता बाळगली गेली आहे.
राज्याच्या राजकारणात भाजपने पक्ष फोडाफोडीचे मोठे राजकारण घडले होते त्यामधून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून मोठी बंडखोरी झाली होती. यामधून बहुसंख्येने आमदार आणि खासदार भाजपसोबत युती करून सत्तेत सामील झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे आणि खा. शरद पवार एकाकी पडतील असे वातावरण भाजपकडून केले गेले होते.
वरील राजकीय पक्ष फोड़ाफोड़ी मधून उलटेच घडत चालले आहे. महाविकास आघाडीतून उमेदवारी घेण्यासाठी उमेदवार मिळतील की नाही अशी परिस्थिती वाटत होती. परंतु महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी चुरस झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेल्या नेत्यांनी आपल्या या कृतीला आपल्या भागातील जनतेचा पाठिंबा मिळेल की नाही याची तमा बाळगली नव्हती. केवळ नेत्यांच्या भरवशावर भाजपकडून मोठ्या विजयाची खात्री दिली जात आहे.
काँग्रेस मधील काही नेते सोडले तर राज्यातून काँग्रेस जाग्यावरच आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत मात्र आपले नेते खा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणारी जनता आजही महविकास आघाडी सोबतच असल्याचे अगदी स्पष्टपणे जाणवत आहे.
सोलापूर जिल्ह्यात सोलापूर आणि माढा हे दोन लोकसभा मतदार संघ आहेत. यामधून सोलापूर मतदार संघातील महाविकास आघाडी मजबूत करून त्याबाबतची खात्री पटल्यावर आ. प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी स्वीकारली आहे. उमेदवारी घेतल्यानंतर तर अक्षरशः मागील निवडणुकीत विरोधक म्हणून भूमिका बजावलेले अनेक दिग्गज नेते यावेळी आपल्या बाजूने घेण्यात आ. प्रणिती शिंदे आणि महाविकास आघाडीचे नेते यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र याच मतदार संघातील खा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते यांनीही आ. प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी मनापासून तयारी ठेवली आहे.
माढा लोकसभा मतदार संघात तर मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्या मनोमिलनामुळे सोलापूर मतदार संघात महाविकास आघाडीला मोठ बळ मिळाले आहे. एवढ्यावरच नाही तर, आणखी काही दिवसात विरोधात राहिलेले अनेक दिग्गज महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याचा आ. प्रणिती शिंदे यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळेच पराभवाची हॅट्रिक टाळण्यासाठी अजूनही मोठी व्युहरचना आखली जात असून, त्यासाठी मोठे यश मिळत आहे.