*करकंब येथील डीएव्ही संकुलात जागतिक वसुंधरा दिवस साजरा

करकंब/ प्रतिनिधी
दयानंद शिक्षण संस्था नवी दिल्ली संचलित करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल व महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्युनिअर कॉलेज येथे आज *22 एप्रिल "अर्थ डे** अर्थात *"जागतिक वसुंधरा दिवस"* साजरा करण्यात आला.
यावेळी प्रशालेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाचे समन्वयक महादेव पुजारी यांनी अर्थ डे अर्थात "वसुंधरा दिवस" निमित्त सजीवसृष्टी या पृथ्वीवर अवतरलेलीआहे तिचा हा दिवस का बरे साजरा करायचा? हा दिवस निसर्ग पर्यावरण आणि मानव यांच्यातले नाते अधिक घट्ट व्हावे पृथ्वी विषयीची कृतज्ञता आणि तिच्या संवर्धनाविषयी जाणीव जागृती व्हावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्याची सुरुवात 1970मध्ये अमेरिकेत झाली.असे सांगितले.
प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम यांनी दिवसेदिवस आपल्याला विविध पर्यावरण समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे आपण आपल्या पर्यावरणाचे जतन व संवर्धन केले तरच आपली वसुंधरा आरोग्यसंपन्न स्वच्छ हरी सुंदर राहणार आहे असे सांगितले.
*संकल्प नको, कृती करु या...*
*वसुंधरा रक्षणासाठी, कटिबद्ध होऊ या....*
अलीकडे मानवाला विकास आणि प्रगती या दोन गोष्टीची चटक लागली आहे त्यामुळे मानव निसर्गातून डोंगर सपाट करणे झा उच्चडे तोडणे असे उद्योग करीत आहे कोळसा आणि भू खानिजा साठी अति प्रमाणात जमीन खणली जात आहे यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत आहे 22 एप्रिल 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आपण समाजामध्ये पर्यावरणाबद्दल जागृती करू शकतो आज विकासाच्या नावाखाली भरमसाठ जंगलतोड सुरू आहे. एप्रिल महिन्यातील वाढते तापमान वाढ आताच तापमान एवढे वाढले असेल तर पुढे विचारायलाच नको पुढच्या वर्षी काय होईल या विचाराने अंगावर काटा येतो.या वसुंधरा दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वसुंधरेचे संरक्षण व संवर्धन करण्याची शपथ घेतली.
यावेळी प्रशालेतील पर्यवेक्षक धनवंत करळे, विनय कुलकर्णी, नागेश घुले, नरसिंह एबोते, संजय पाटील, सुरेश दहीगीरे, अभिषेक चोपडे, मिथुन चंदनशिवे, गणेश गायकवाड, रोहीदास माने,शुकूर बागवान सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
*संकल्प पर्यावरण रक्षणाचा...*
*समृद्ध वसुंधरेच्या रक्षणाचा....*