*कान्हापुरी येथील जिल्हा परिषद शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न*

करकंब /प्रतिनिधी:-
कान्हापुरी ता पंढरपूर येथे दिनांक 19/4/2022 रोजी जि . प. प्रा. शाळा कान्हापुरी शाळा येथे पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला .कोरोनामुळे दोन वर्ष विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे .सदर मेळाव्यात विद्यार्थ्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक प्रभात फेरी काढण्यात आली. इयत्ता पहिलीच्या दाखल पात्र विद्यार्थ्यांचे औक्षण, केक कापून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. गुलाब फुले व फुगे देऊन हलगी च्या साथीने वाजत गाजत स्वागत करण्यात आले .नवीन दाखल होणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी , पहिला माझा ठसा ,गणन पूर्व तयारी, भाषा विकास , शैक्षणिक विकास , सामाजिक विकास, प्रबोधन व अभिप्राय , इत्यादी स्टॉल लावण्यात आले होते . त्याच बरोबर शाळेतील पहिला सेल्फी या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला . कुस्ती स्पर्धेतील कामगिरीबद्दल शाळेची विद्यार्थिनी सलोनी बैरागी हिचा सन्मान शाळेमार्फत करण्यात आला , सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी श्रीराम कर्चे (बीएसएफ जवान )यांची विशेष उपस्थिती होती . सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कान्हापुरी सरपंच ,उपसरपंच ,सर्व ग्रामपंचायत सदस्य , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सर्व सदस्य शाळा प्रेमी नागरिक पालक , माता-पालक ,अंगणवाडी सेविका ताई, शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते . या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी शाळेचे शिक्षक स्टाफ चे अभिनंदन केले. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला