*करकंब नंबर 3 विविध कार्यकारी सोसायटी च्या संचालक पदी भगवान जगताप यांची निवड* *वार्ड नंबर चार चे किंग मेकर ..मुलुख मैदानी तोफ ...पक्षनेते .... भगवान उर्फ पप्पा यांच्या निवडीने चार मध्ये जल्लोष....!*

करकंब/ प्रतिनिधी:
-येथील करकंब विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नंबर 3 च्या नुकत्याच झालेल्या संचालक पदाच्या निवडी मध्ये पक्षनेते व चार नंबर वार्डातील किंग मेकर मुलुख मैदानी तोफ भगवान उर्फ पप्पा जगताप यांची संचालकपदी नुकतीच निवड करण्यात आली.
या संचालक पदाच्या निवडीमुळे चार नंबर वॉर्डातील मुलुख मैदानी तोफ व पक्षनेते भगवान उर्फ पप्पा जगताप यांच्या निवडीमुळे वार्ड 4 मध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला.
या करकंब नंबर तीन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या संचालक पदाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा संघटक नरसप्पा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केली असल्याने यापुढील कार्यकालात मोठ्या जोमाने या संचालक पदाची धुरा खांद्यावर घेऊन काम करणार असल्याची भावना व्यक्त करून सोसायटी ही पिठाची गिरणी नसून ती एक सभासद आणि शेतकऱ्यांची आर्थिक जननी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय यापुढे घेतला जाईल यावेळी सांगितले.