*राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे राज्यव्यापी दौऱ्यामधील बैठकांना मोठा प्रतिसाद* *राष्ट्रवादीच्या पक्षवाढीसाठी लागणार मोठा हातभार* *या बैठकामधून होत आहे नव्याने पदाधिकारी निवडीच्याच चर्चा*

*राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे राज्यव्यापी दौऱ्यामधील बैठकांना मोठा प्रतिसाद*  *राष्ट्रवादीच्या पक्षवाढीसाठी लागणार मोठा हातभार*  *या बैठकामधून होत आहे नव्याने पदाधिकारी निवडीच्याच चर्चा*

पंढरपूर/प्रतिनिधी 
राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांनी आपल्या विभागातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या भेटीचा आणि बैठकाचा सर्व राज्यातील विविध जिल्ह्यमध्ये नियोजित कार्यक्रम आखला आहे. हा नियोजित दौरा आज शुक्रवार दि 6 आगस्ट पासून सुरू करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व जिल्ह्यमध्ये  बैठकीचे नियोजन सुरू केले असून दौरा सुरू झाला आहे. यामध्ये विविध जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मधून मोठा प्रतिसाद मिळत आहे.


   काल शुक्रवार पासून सुरू केलेला हा दौरा विदर्भातील विविध भागामध्ये10 आगस्ट पर्यंत राहणार आहे. 6 आगस्ट रोजी लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातील बैठका पार पडल्या आहेत.
   आज शनिवार दि 7आगस्ट रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा दौरा झाला.रविवार दि8आगस्ट रोजी गोंदिया भंडारा, आणि नागपूर तर 9 आगस्ट रोजी वर्धा यवतमाळ आणि अमरावती या भागाचा दौरा होणार आहे.10 आगस्ट रोजी अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यातील दौरा होणार आहे. अशाप्रकारे पहिल्या टप्प्यात विदर्भातील दौरा आटोपून दुसऱ्या टप्प्यात  मराठवाड्यात हा दौरा होणार असून त्या ठिकाणी दौऱ्याचे नियोजनही लवकरच कळविण्यात येणार असल्याचे नागेशदादा फाटे यांनी सांगितले आहे.
     प्रदेशाध्यक्षपदी नव्याने जबाबदारी दिली असल्याने नागेशदादा फाटे यांनी आपल्या  राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे राज्यभरातून चांगलीच बांधणी करण्यासाठी राज्यभरातून दौऱ्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हानिहाय नवीन कार्यकारिणी आणि राज्यातील कार्यकारणी निवडी करण्याच्या दृष्टीने हा दौरा आयोजित केला आहे, या  दौऱ्यात पक्षबांधणीच्या दृष्टीने बैठकीचे नियोजन असल्याचे नागेशदादा फाटे यांनी सांगितले आहे.
 आपल्यावर  देशाचे नेते खा.शरद पवार साहेब यांच्यासह  राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेतेमंडळी यांनी जी मोठी जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी पार पाडून सर्व राज्यात आणि तालुकास्तरावर उदयोग व व्यापार सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रियेला  सुरुवात केली असल्याचे नागेशदादा फाटे यांनी सांगितले आहे.


 महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागचे राज्य प्रमुख मा नागेशदादा फाटे यांचा मराठवाडा व विदर्भ दौऱ्यास सुरूवात...
 काल दि 6आगस्ट रोजी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर,चाकुर तालूक्याचे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार व लातूर जिल्हाध्यक्ष मा .बाबासाहेब पाटील यांची समक्ष भेट घेवून उदयोग व व्यापार विभागात आणखी काय बदल करता येतील, तसेच नव्याने पदाधिकारी निवडीबाबत सविस्तर चर्चा करून त्यांनी निवडी संदर्भात सविस्तर पूढील दौऱ्यास सुरुवात .केली.
   नांदेड येथे उद्योग-व्यापार विभाग प्रमुख जिल्हाध्यक्ष नागापूरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष वाढीसाठी संघटन मजबुत करण्यासाठी पवार साहेब  यांचे  विचार  नांदेड मधील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यंत करणार .या  उद्योग व व्यापार  विभागाचे प्रमुख नागेश फाटे साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .नादेंड जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सय्यद मौलाना साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाळासाहेब वाशीकर सचिव श्रीकांत  मांजरमकर  मनीष अग्रवाल पंढरपूर ता . उपाध्यक्ष कल्याण कुसूमडे कार्यकारणी सदस्य ग्रंथालय सेल जिल्हाध्यक्ष  बहुसंख्येने उपस्थित होते.
 आज चंद्रपूर येथे उद्योग व व्यापार विभाग महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी व शहर कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षवाढीसाठी व संघटन मजबूत करण्यासाठी पवार साहेबांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत  पोहोचण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य महिला आघाडीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके चंद्रपूर शहर जिल्हा शहर कमिटीचे अध्यक्ष राजीव कक्कड व्यापार व उद्योग जिल्हाध्यक्ष चंद्रकांत अग्रवाल रवी श्री केरोसीन पेट्रोल सचिव मनोज काचेला ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट असिस्टंट  प्रदीप गोरशेट्टीवार सुनील काळे विधानसभा अध्यक्ष चंद्रपूर संजय खवले रवी जुमडे राजू पवार अभिनव देशपांडे अक्षय बनसोडे पंढरपूर तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष कल्याण कुसूमडे सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.