*अडचणीत असलेल्या उद्योग व व्यापारी वर्गास नागेश फाटे यांच्या नेतृत्वाखाली मदतच करू* *पुणे येथील राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाच्या सदस्य नोंदणीच्या वेबसाईटचे उदघाटन प्रसंगी ना. जयंतराव पाटील यांचे अस्वासन* *नागेश फाटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे काम योग्य दिशेने असल्याचे व्यक्त केले मत*

पंढरपूर/प्रतिनिधी
राज्यातील उद्योग व व्यापारी वर्गही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करीत आहे, त्यामुळे या वर्गाला आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास न होता उलट मदतच केली पाहिजे. हीच आपली भूमिका असून, उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या नेतृत्वाखाली तेच काम करावे लागेल असे अश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांनी दिले आहे.
पुणे येथे आज दुपारी राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभागाच्या सभासद नोंदणी आणि वेबसाईटचे उदघाटन ना. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ना.पाटील म्हणाले की या उपस्थित वर्गाचे संघटन आणि त्यांना लागणारी मदत, व्यवसायातील अडचणी यावर योग्य तोडगा हे काम पूर्वीच सुरू व्हायला पाहिजे होते. परंतु ते झाले नाही. परंतु नागेश फाटे यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्यापासून हे काम योग्य दिशेने चालू असून असेच काम सुरू ठेवावे असे ना .पाटील यांनी सांगितले.
आज या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमासाठी जी राज्यभरातील उद्योग व व्यापारी यांची उपस्थिती दिसून येत आहे. ते म्हणजे प्रदेशाध्यक्ष फाटे आपल्यापर्यंत पोहोचले असल्याची पावतीच आम्ही समजून या चांगल्या कार्याला शुभेच्छाही दिल्या.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,
प्रदेश उपाध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग केतन सदाफुले,
मोहन ठाकरे,
राहुल जगताप,
बाळासाहेब देशमुख,
प्रदेश सरचिटणीस उद्योग व व्यापार विभाग
दिनेश मोरे,
निलेश शहा,
प्रदेश चिटणीस उद्योग व व्यापार विभाग
राजकुमार माने,
मनिषा भोसले,
प्रदेश सचिव
कल्याण कुसूमडे,
प्रदेश सहसचिव
स्वप्निल आहोरकर,प्रदेश सदस्य
राजकुमार गुगळे,
जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यापार
गणेश गुप्ता,
सुभाष गव्हाणे,
धिरज सोनवणे,
मनोराज पाटील,
संजय चव्हाण,
विवेक घोगरे,
सुदर्शन मुंडे, शहराध्यक्ष
भोलासिंग अरोरा,
विजय कुमार पिरंगुटे,
सचिन चव्हाण,
मोनिका जाधव,
डॉ .महौम्मद खाजेनूरी,
प्रीती चड्डा ( पूणे शहर अध्यक्ष उद्योग व व्यापार ), योगेश वाघज,
उद्योजक राजश्री घागरे
किसान सेल पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा विजया भोसले सुरेखा खोपरे उपस्थित होते.