*स्व. बाळासाहेबांचे विचाराचे वारसदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच* *शिवसेनेच्या शिवदूत स्नेह मेळाव्यात संभाव्य उमेदवार राजू खरे यांचे वक्तव्य* *मोहोळ विधानसभा मतदार संघातील मार्डी येथून शिवसेना मनामनात,अन् घराघरात या संकल्पनेला सुरुवात*

*स्व. बाळासाहेबांचे विचाराचे वारसदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच*  *शिवसेनेच्या शिवदूत स्नेह मेळाव्यात संभाव्य उमेदवार राजू खरे यांचे वक्तव्य*  *मोहोळ विधानसभा मतदार संघातील मार्डी येथून शिवसेना मनामनात,अन् घराघरात या संकल्पनेला सुरुवात*

पंढरपूर/प्रतीनिधी

सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील सरकार हे जनतेच्या हितासाठी योग्य निर्णय घेत आहे. सर्वसामान्य जनतेला आवडणारे हे महायुतीचे सरकार तर लोकाभिमुख ठरत आहे. मात्र शिवसेना पक्ष कार्यातही कार्यकर्त्यांना न्याय देत पक्ष मजबूत करण्याचे काम सुरू आहे. केवळ स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसदार म्हणून मुख्यमंत्री यांच्यावर शिककामोर्तब झाले आहे. त्यामुळे शिवसेना अधिक बळकट होत जाणार असल्याचे मत मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी व्यक्त केले आहे.
            राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आ.रामदासभाई कदम, आ.भरतशेठ गोगावले,मंत्री दादासाहेब भुसे, आ. संदिपान भुमरे,खा.युवा नेते श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात शिवदूत स्नेह मेळावा राबविण्यात येत असून, अश्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये  शिवसेना नेते राजू खरे  पुढाकारातून मार्डी या गावात, 'शिवसेना मनामनात,' 'शिवसेना घराघरात' संकल्पना राबवत या शिवदूत मेळावा संपन्न झाला.
   दिवाळीनिमित्त जो उपहार पाठवण्यात आला होता. तो राजू खरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शेकडो शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भावी आमदार म्हणून राजू खरे यांचे जंगी स्वागत करत, गावातील मुख्य चौकातून रॅलीही काढण्यात आली.
यावेळी उद्योजक राजू खरे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कश्याप्रकारे सामान्यातून सामान्य जनतेची व कार्यकर्त्याची कामे करत असल्याचे जनतेपुढे मांडण्यात आले. येणाऱ्या काळात संघटना बांधणीवर शिंदे सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती  तळागाळातील लोकांपर्यंत माहिती पोचवावी .यासाठी मुख्य उद्देश असून संघटना जेवढी मजबूत,तेवढीच आपली ताकद येणाऱ्या निवडणुकांत वाढेल म्हणून सर्वांनी आतापासूनच कामाला लागावे असे देखील आवाहन करण्यात आले

.
या कार्यक्रमप्रसंगी मोहोळ विधानसभेचे अध्यक्ष प्रकाश पारवे, शिवसेना तालुका  प्रमुख सुधीर गोरे, उपतालुकाप्रमुख उमाकांत करंडे, युवासेना तालुका प्रमुख आकाश गजघाटे, शिवसेना जिल्हा सचिव जावेद भाई पटेल, शिवसेना विभाग प्रमुख सरपंच लक्ष्मण राठोड, वाहतूक सेना तालुका प्रमुख विजय गरड, बजरंग देवकर, अशपाक शेख, विलास वाघमारे, नंदु गवळी, योगेश जानराव, मुकुंद जांभळे,अतुल सावंत, विशाल गवळी, किरण गजघाटे, अनिकेत गजघाटे, अनिल जाधव, रंगनाथ गुरव, कुणाल गायकवाड, राजकुमार गजघाटे व  शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.