*राष्ट्रीय चर्मकार महासंघ शहर जिल्हा सोलापुर यांची बैठक संपन्न.*

करकंब /प्रतिनिधी :-
सोलापूर शहर
राष्ट्रीय चर्मकार महासंघ शहर जिल्हा बैठक येथील विश्रारामबाग येथे रविवार दिनांक 14/08/ 2022 रोजी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी सोलापूर शहर पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थिती विविध विषयावर चर्चा करून सामाजिक विधायक कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.
दिनांक :-11 सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचे नियोजन करून दहावी-बारावी मध्येउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार ,समाजातील अधिकाऱ्यांचा सत्कार,
संत रोहिदास महाराज पुतळा संबंधी महानगर पालिका आयुक्तांची यांची बुधवार दिनांक 17 /8/ 2022 रोजी संध्याकाळी 4 वाजता भेट घेऊन सविस्तरपणे चर्चा करणे.राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्यकारणी सदस्य सोलापूरला भेट देणार असून त्यानिमित्ताने मंगळवार दिनांक 16/ 8 /2022 सकाळी 11 वाजता सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. सोलापूर शहरामध्ये नगरसेवकांची निवड़णुक विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष संजय बाबा शिंदे. गणेश तुपसमुद्रे, राम कबाडे ,अजय राऊत, परशुराम मब्रूखाने, शावरप्पा वाघमारे, तानाजी जाधव, शिवपुत्र वाघमारे ,राजेंद्र कांबळे ,सरफराज कांबळे , प्रदीप लांबतुरे , बाळासाहेब आळसंदे ,अशोक सुरवसे आदी उपस्थित होते.