*पद्मश्री राहीबाई पोरे(बीजमाता) यांच्या हस्ते समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना नाशिक येथे पुरस्कार प्रदान*
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर येथील समाजसेवक मुजम्मील कमलीवाले हे नेहमीच जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन समाजसेवा करत असतात कोव्हीड काळात ही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.वाढदिवसाला अनावश्यक खर्च करण्याचे टाळुन तोच खर्च ते चांगल्या कामासाठी वापरतात.कोरोणा काळात कोरोणा योध्दा या पुरस्काराने त्यांना विविध संघटने कडुन पुरस्कार मिळालेले आहेत आत्तापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या समाजसेवकाची संजीवनी फाऊंडेशन ने हि दखल घेतली.
पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये आपल्या समाजकार्याचा ठसा उमटवणारे समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांचे मोठे कार्य असुन नेहमीच चर्चेत असतात व त्यांनी अनाथ गरजु गरिबांसाठी मदत करताना दिसुन येतात त्यांच्या या कार्याची दखल नाशिक येथील संजीवनी फाऊंडेशन यांनी घेतली.समाजातील विविध क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींना पुरस्कार सोहळा संपन्न झाला.हा कार्यक्रम नाशिक येथील अण्णाभाऊ साठे सभागृह मध्ये पार पाडला.
पद्मश्री राहीबाई पोपेरे (बीजमाता) यांच्या हस्ते समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2023 या पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले तसेच त्यांना मानपत्र,गौरवचिन्ह,सन्मानचिन्ह,गौरव पदक व शाल देऊन गौरव करण्यात आले.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल रमेश बैस यांनी पण पत्राद्वारे सगळ्या पुरस्कारप्राप्त ना अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या
समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी असे प्रतिक्रिया केली मला आपल्या गावात व जिल्ह्यात आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले मात्र माझ्या सासरवाडीत पुरस्कार देऊन जो सन्मान केला त्या सन्मानासाठी मी ऋणी आहे.मला माझ्या सामाजिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.माझे सामाजिक कार्य अखंडपणे सुरु राहील.