*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बांधकाम उपविभागास दिले निवेदन...!* *करकंब-पंढरपूर रस्त्याची त्वरित सीडीवर्क दुरुस्त करण्याची मागणी* *आषाढी यात्रा पूर्वी आधी काम पूर्ण करा... अन्यथा तीव्र आंदोलन. मनसेने दिला इशारा.*

करकंब /प्रतिनिधी
:-करकंब येथील करकंब ते पंढरपूर रस्त्यालगत दोन्ही बाजूस साईट पट्टी तसेच सीडी वर्क चे काम न झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात लहान मोठे अपघात घडत आहेत. त्यातच आषाढी एकादशी यात्रा जवळ आल्याने या मार्गावरून असंख्य संतांच्या पालख्या व दिंड्या या मार्गावरून जात असतात. यामध्ये दोन ते अडीच लाख भाविक या मार्गावरून ये-जा होत असते. विशेषता या मार्गावरून मोठ्या प्रमाणात लहान व मोठ्या वाहनांची वर्दळ ही सततची चालू असते. आणि या ब्रह्मानंद महाराज मठा पासून काही अवघ्या अंतरावर व या रस्त्यालगत स्मशानभूमी असल्याने अंतयात्रा ही याच मार्गावरून येत असते अशातच मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने येतात व जात असतात त्यामुळे नुकत्याच झालेल्या गुरसाळे सारखी घटना घडू नये. म्हणून या रस्त्याची सीडी वर्क दुरुस्ती त्वरित करण्याची मागणी करकंब येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग करकंब यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली असून हे काम आषाढी यात्रेपूर्वी त्वरित करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार , महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष सुनील धोत्रे, करकंब शहराध्यक्ष बालाजी पवार, करकंब शहर उपाध्यक्ष अक्षय सुर्वे, संजय मोहिते, विजय धोत्रे , लखन धोत्रे, रोहित धोत्रे, महेश धोत्रे आदि सह बहुसंख्येने मनसे सैनिक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.