*उंबरे पागे येथील महिलेचा घरात घुसून विनयभंग* *सामाजिक कार्यकर्त्याविरोधात करकब पोलिसात गुन्हा दाखल*

पंढरपूर /प्रतिनिधी
उंबरे (पागे) ता. पंढरपूर येथील एका विवाहित महिलेच्या घरात घुसून विनयभंग करण्यात आल्याची तक्रार, करकंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे .याप्रकरणी येथील बाबुराव ऊर्फ बापू मारुती मोहिते याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दि. 20 जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास या घटनेतील आरोपी बापू मोहिते संबंधित महिलेच्या घरात घुसला. यावेळी या महिलेच्या घरात तिच्या दोन मुलीही होत्या .तुझा पती कुठे आहे सांग ,असे म्हणत घरात ओढू लागला. संबंधित महिलेस घरात घेऊन जाताच, ही महिला जोराने ओरडू लागली. तिच्या मुलींनीही मोठ्याने ओरड केली .यावर तो घरातून निघून गेला . यावर महिलेने आपल्या पतीस फोन केला. पतीने तिला तिच्या भावास पोलीस ठाण्यात जाण्याची सूचना केली. जबरदस्तीने घरात घुसून लज्जा वाटेल असे वर्तन बापू मोहिते यांनी केले असल्याची तक्रार , संबंधित विवाहित महिलेने करकंब पोलिस ठाण्यात दाखल केली आहे .याप्रकरणी बाबुराव उर्फ बापू मारुती मोहिते याच्या विरोधात भादवि कलम ४५२, ३५४ ,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास करकंब पोलीस करत आहेत.
चौकट
या प्रकरणातील आरोपी बाबुराव ऊर्फ बापू मारुती मोहिते , हा सामाजिक कार्यकर्ता असून, त्याने यापूर्वी एका सामाजिक घटनेमध्ये काम केले आहे. या प्रकाराने उंबरे पागे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे