*करकंब पोलीस स्टेशन येथे रेझिंग डे सप्ताह चे आयोजन.* *विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन.*

करकंब /प्रतिनिधी :-
करकंब पोलीस स्टेशन करकंब येथे रेझिंग डे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त करकंब येथील विविध प्रशालेचे विद्यार्थी-विद्यार्थी सहभागी झाले होते.
पोलीस विभागाकडून दिनांक 02 जानेवारी ते 08 जानेवारी या कालावधीत पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येतो. दिनांक 02/01/2023 रोजी रेझिंग डे निमित्त करकंब पोलीस स्टेशन येथे *आदर्श प्रशाला करकंब, न्यू इंग्लिश स्कूल करकंब, रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब, सह्याद्री आयटीआय कॉलेज करकंब* इयत्ता नववी ,दहावी विद्यार्थी- विद्यार्थिनी यांना पोलीस ठाणे येथे आमंत्रित करून पोलीस ठाण्याचे दैनंदिन कामकाजाबाबत सर्व माहिती देण्यात आली. पोलीस ठाणे कडील सर्व विभागाचे,तसेच पोलीस ठाणे कडे उपलब्ध असलेले शस्त्र संबंधीची सहाय्यक पोलीस निरीक्षक- निलेश तारू यांनी प्रात्यक्षिकासह माहिती तर कार्यालयीन कामकाजाची माहिती पोलीस उपनिरीक्षक- शशिकांत कवितकर यांनी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत कवितकर, पोहेकॉ/ दादासाहेब सुळ, पोहेकॉ/ बालाजी घोळवे, पोना/संतोष पाटेकर, पोना/दत्तात्रय वाघमारे पोना/मयूर गव्हाणे, पोकॉ/ रमेश फुगे व पोलीस अंमलदार , करकंब येथील प्रशालेचे सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी, वर्गशिक्षक उपस्थित होते.