*शेताच्या बांधावरील दगडाने केला घात.. आरोपी तुरुंगात... जखमी मृत्यूच्या दारात..... दगड मात्र शेतात.....!* *आरोपींना चार दिवसाची पोलिस कस्टडी.* *करकंब पोलिसांनी सात आरोपींना 24 तासाच्या आत केली अटक.* *दोन आरोपी अद्याप फरार.*

*करकंब /प्रतिनिधी :
-ग्रामीण भागात आजही किरकोळ कारणावरून गंभीर स्वरूपाचे वाद निर्माण होतात. आणी या वादाचे गंभीर परिणाम वाद करणारा आणि वाद घालणारा या दोघांच्या बरोबर कुटुंबालाही त्याचा मोठा परिणाम भोगावा लागत असल्याची उदाहरणे घटना प्रत्यक्षात पाहत असतो. मात्र ज्या किरकोळ करणावरून "वाद" होतात .ते मात्र "नामा निराळेच" राहतात .आणि वाद करणारे मात्र त्यांचे परिणाम भोगत राहतात. अशीच काही घटना जळोली ता. पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या शेतीच्या बांधावरील "दगड" का काढला या कारणावरून झालेल्या वादातून झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे शेताच्या बांधावरील "दगडाने' केला घात.. आरोपी "तुरुंगात"... जखमी "मृत्यूच्या" दारात.... "दगड" मात्र शेतात....! अशी अवस्था झाल्यामुळे अशा घटनेमुळे गंभीर परिणाम भोगावे लागतात.ज्या कारणामुळे वाद निर्माण झाला तो "दगड" मात्र नामा निराळाच राहिला. हे कळत असूनही समाजात सातत्याने वाद निर्माण होत असतात. हे मात्र जावे जेव्हा त्यांच्या वंशा.. तेव्हा त्यास कळे....! या म्हणीच्या उक्तीप्रमाणे तंतोतंत लागू पडत आहे.
जळोली ता.पंढरपूरला येथे सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी भाईगुडे वस्ती येथे शेतीचे बांधाच्या "दगडाचे" कारणावरून कोयते, काट्या व दगडाने दोन शेतकऱ्यांच्या गटात तुफान हाणामारी झाली. या शेतीच्या वादातून जीवघेणा हल्ल्याची घटना घडली. घटनेत एक जण गंभीर जखमी असून अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती समजताच करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक-निलेश तारू, पोलीस उपनिरीक्षक-अजित मोरे व संबंधित पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी जाऊन भेट देऊन या घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून या गुन्ह्यातील सात आरोपींना करकंब पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली. यातील आरोपींना पंढरपूर येथील न्यायालयासमोर उभे केले असता आरोपींना चार दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या घटनेतीलअद्याप दोन आरोपी फरार असून करकंब पोलीस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत.