*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेची सोशल मीडियातून बदनामी* *करकंब पोलिसात एकावर गुन्हा दाखल*

*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेची सोशल मीडियातून बदनामी*  *करकंब पोलिसात एकावर गुन्हा दाखल*

करकंब/प्रतिनिधी-
करकंब ता पंढरपूर येथील शूरवीर महाराणा प्रताप या व्हाट्सअप्प ग्रुपवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेची बदनामी करणारी पोस्ट केल्याने  रामनारायणदास गोपालदास बैरागी यांच्यावर करकंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   सविस्तर माहिती अशी की,करकंब मधील शूरवीर महाराणा प्रताप या व्हाट्सअप्प ग्रुप वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामी व  सामाजिक तेढ निर्माण करणारी पोस्ट येथील रामनारायणदास गोपालदास बैरागी यांनी केली असल्याने त्यांच्याविरोधात युवा सेना पंढरपूर तालुका प्रमुख रणजित कदम यांनी करकंब पोलिसात फिर्याद दिली आहे. यावेळी करकंब व परिसरातील शिवसैनिक करकंब पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर आरोपीविरोधात कलम 295(अ),153,500 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (ई)(अ) आदी कलमाखाली करकंब पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.