*केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केला चेअरमन अभिजीत पाटील यांचा सन्मान* *देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प धाराशिव साखर कारखान्यात उभारल्याबद्दल पाटील यांचे केले गडकरींनी कौतुक*

*केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केला चेअरमन अभिजीत पाटील यांचा सन्मान*  *देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प धाराशिव साखर कारखान्यात उभारल्याबद्दल पाटील यांचे केले गडकरींनी कौतुक*

पंढरपूर /प्रतिनिधी- 

दि.२० मार्च रोजी मुंबई येथे 'शुगर आणि इथेनॉल इंडिया काॅनफर्स २०२२ मिटींग घेण्यात आली त्यावेळी रस्ते, वाहतूक आणि परिवहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा केल्याबद्दल धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने देशाचे नेते शरद पवार यांनी साखर कारखान्यामध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभा करावा त्यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांनी प्रतिसाद देत कारखान्यातील इथेनाॅल प्रकल्प बंद ठेवून लाखोचे नुकसान करून अवघ्या अठरा दिवसांत ऑक्सिजन प्रकल्प उभारला त्यातून लाखो रूग्णांना ऑक्सिजन पुरविण्याचे काम चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले.