*अडचणीतील उद्योगांना राष्ट्रवादीच सावरणार - नागेश फाटे*

पंढरपूर (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार, उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे , त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कायमच कार्यरत राहील , असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे नवनियुक्त व्यापार आणि उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश पाटील यांनी केले. ते नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता , एका बैठकीत बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, राज्याचे संपर्कप्रमुख जयसिंग गायकवाड , प्रदेश सरचिटणीस दिनेश मोरे आदी प्रमुख उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या उद्योग आणि व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. रविवार दि.२९ ऑगस्ट रोजी त्यांनी , नंदुरबार जिल्ह्याचा दौरा केला . नंदुरबार येथे पार पडलेल्या बैठकीत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे हे होते . या बैठकीस नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजक, तसेच व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग आणि व्यापार विभागाचे संघटन बळकट करण्यासाठी, नागेश फटे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. राज्यातील उद्योजक आणि व्यापारी यांची साथ घेऊन , त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत . नंदुरबार येथील बैठकीत त्यांनी उपस्थित व्यापारी वर्गास, कोणत्याही अडी-अडचणीचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. जिल्ह्यातील उद्योग आणि रोजगार हा मोठा प्रश्न असून, जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळणे गरजेचे आहे . नंदुरबार येथील तरुण हे उच्च शिक्षण घेऊन घरी बसले आहेत, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नंदुरबार येथील एमआयडीसी उभारण्यासाठी, प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस राष्ट्रवादीचे पंढरपूर ता. उपाध्यक्ष कल्याण कुसूमडे ,नंदुरबार जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, व्ही.जे.एन.टी प्रदेश उपाध्यक्ष नरेश पवार, युवा नेते राऊ बाबा मोरे, जिल्हा उपाध्यक्ष मोहन भाऊ शेवाळे, मोहन माळी, जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी, जिल्हा कार्यकारणी सदस्य रामराव आघाडे,जगदीश जयस्वाल, महेंद्र चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष सौ.अश्विनीताई जोशी, नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, नंदुरबार तालुका अध्यक्ष प्रदिप पाटील, शहादा तालुका अध्यक्ष माधवराव पाटील, तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे, नंदुरबार विधानसभा क्षेत्राध्यक्ष रवींद्र पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते केसर सिंह क्षत्रिय, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम चव्हाण , सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय खंडारे, सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे, सेवादल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, युवती शहर कार्याध्यक्षा हर्षा देशमुख, महिला जिल्हा चिटणीस प्रतिभा कुलकर्णी, नंदुरबार महिला जिल्हा उपाध्यक्ष कुशल मोरे, उपाध्यक्षा शिलाताई मराठे,शहर महिला अध्यक्षा उषाताई तायडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष छोटू भाऊ कुवर, युवा शहराध्यक्ष नंदुरबार लल्लाभाऊ मराठे, युवक तालुकाध्यक्ष नंदुरबार सुरेश वळवी,शहादा तालुका महिला अध्यक्ष रेश्मा ताई पवार,जिल्हा सदस्य कांचन मोरे,नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष सोशल मीडिया सेल सुनिल गावित,नंदुरबार शहराध्यक्ष हितेश ढिवरे,महिला शहर उपाध्यक्षा हेमांगी देवरे,वंदना पाटील,सरचिटणीस मोनिका सोनार,संगिता पाटील,प्रतीक पाटील,रुपेश जगताप,मिलिंद जाधव, निलेश चौधरी आदी उपस्थित होते