*प्रा. दत्तात्रय काळेल यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी पदवी प्राप्त*

*प्रा. दत्तात्रय काळेल यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी पदवी प्राप्त*

पंढरपूर/प्रतिनिंधी 

पंढरपूर येथील  ‘रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दत्तात्रय कळेल यांना
शिवाजी विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी पदवी बहाल केली आहे. त्यांनी 'शरद पवार आणि महाराष्ट्रातील पुरोगामी लोकशाही दलाचे शासन : एक चिकित्सक
अभ्यास’,  हा संशोधन प्रबंध पीएच.डी पदवीसाठी विद्यापीठास सादर केला होता.
या संशोधन कार्यात प्रा.डॉ. अजितानंद जाधव यांनी त्यांना मार्गदर्शन
केले.’
        प्रा. दत्तात्रय काळेल यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
शरदचंद्र पवार, उपाध्यक्ष भाई गणपतराव देशमुख, चेअरमन डॉ. अनिल पाटील,
माजी चेअरमन डॉ. एन.डी.पाटील, सचिव प्रोफेसर डॉ. विठ्ठल शिवणकर, उच्च
शिक्षण विभागाच्या सहसचिव प्राचार्य डॉ. प्रतिभा गायकवाड, सेवानिवृत्त
प्राचार्य डॉ.आर.डी.गायकवाड, राजेंद्रतात्या फाळके, जनरल बॉडी सदस्य
रोहितदादा पवार, प्रा. नानासाहेब लिगाडे, महादेवबापू बाड, मध्य विभागाचे
चेअरमन संजीव पाटील, प्रोफेसर डॉ. रवींद्र भणगे, डॉ. शिवाजी पाटील,
बाबासाहेब करांडे, संभाजीनाना होळकर व प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे यांनी
अभिनंदन केले. प्रा. काळेल हे सांगोला तालुक्यातील खिलारवाडी या गावचे
सुपूत्र असून त्यांच्या या यशाबाबत शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर
अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.