*पालखी मार्गाला आली अवकळा... आता तुम्हीच बघा एकनाथा......!* *श्री संत एकनाथ महाराज पालखी मार्गाची दुरावस्था.

*पालखी मार्गाला आली अवकळा... आता तुम्हीच बघा एकनाथा......!*   *श्री संत एकनाथ महाराज पालखी मार्गाची दुरावस्था.

करकंब /प्रतिनिधी :-

आषाढी एकादशी सोहळ्यासाठी श्री पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेल्या करकंब येथील टिळक चौक येथे नरसिंह मंदिरात श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. करकंब येथे श्री संत एकनाथ महाराज व श्री संत निवृत्तीनाथ महाराज या मुख्य संतांच्या  सोहळा व हजारो वारकरी अरण व तुळशी मार्गे करकंब कडे पूर्वीपासून परंपरेने चालत येत असतात. अगदी करकंब च्या प्रवेशद्वारा जवळच सोळाव्या शतकातील असलेल्या शिवकालीन थोरली वेस च्या प्रवेशद्वारात  श्री संत एकनाथ महाराज पालखी या मार्गावर गेल्या अनेक दिवसापासून पाण्याचे मोठे डबके साचल्याने या पालखी मार्गाला अवकळा आल्याची चर्चा ग्रामस्थांनामधून केली जात आहे. सोळाव्या शतकातील शिवकालीन असलेली थोरली वेस ही प्राचीन इतिहासाची एकमेव साक्ष असून करकंब च नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील  एक अस्मिता असून  ही इतिहासकालीन अनेक वर्षानुवर्ष असलेली ही थोरली वेस.. ढसाढसा... रडत .... असल्याचे चित्र दिसून येत असल्याने त्यातच पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने श्री एकनाथ महाराज त्याचबरोबर अनेक साधुसंत यांच्या पालखी सोहळा करकंब मुक्कामी येत असल्याने पालखी मार्गाची व तळाची झालेली दुरावस्था.. आलेली अवकळा... त्यातच शाळेतील जाणारे येणारे विद्यार्थी विद्यार्थिनींना होत असलेला दररोज चा त्रास.... यामुळे आता भाविक भक्तांना बरोबर ..गावकरीही म्हणू लागले पालखी मार्गा आली अवकळा... आता तुम्हीच बघा श्री संत एकनाथा ....!
अवघ्या काही दिवसावर आषाढी एकादशी सोहळा येऊन ठेपला असताना पंढरपूर कडे पायी वारी चालत येणाऱ्या वारकऱ्यांचे हाल होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन यांनी अनेक वेळा पंढरपूर सोलापूर यासंदर्भात प्रशासकीय मीटिंग, बैठका आयोजित केल्या. परंतु त्या अनुषंगाने सध्या करकंब मध्ये मात्र याबाबत सगळेच चित्र दिसून येत आहे. पालखी मार्गावर ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य रस्त्याची दुरावस्था पाण्याची डबकी ..बेसुमार वाळू साठा ..खडी ...बांधकाम साहित्य... लहान-मोठी वाहनांचा रस्त्याच्या कडेला लावलेला खच , यामुळे पालखी मार्ग गेला कुठे...? हे आता प्रशासकीय अधिकाऱ्यांना शोधण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.या वाळू साठा बाबत गाव कामगार तलाठी यांनी काय कारवाई केली हे ही गुलदस्त्यात असून विशेषता या भूमिकेकडे करकंब ग्रामपंचायत व प्रशासन गावात आहे की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका निर्माण होत असल्याची चर्चा ऐकू येत आहे.आणि विशेषता  त्यावरचा कहर म्हणजे करकंब पोलीस ठाण्याचे वाहतूक शाखेचे जाणीवपूर्वक सर्वसामान्य लोकांना त्रास होण्याच्या उद्देशाने डोळेझाक केली जात असल्याचे करकंब ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.