*बुरशीजन्य रोगापासून वनस्पतीचे संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शन*

करकंब /प्रतिनिधी
- महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न साईकृपा कृषी महाविद्यालय अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतिम वर्षाचे विद्यार्थ्यां करिता राबवला जातो. कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी रविराज नारायण लोंढे या विद्यार्थ्याने नगोर्ली तालुका माढा येथील शेतकऱ्यांना विविध बुरशीजन्य रोगांपासून वनस्पतीचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळे बोर्डो मिश्रण कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. बोर्डो पेस्टचा वापर केल्यामुळे बुरशीजन्य रोगांपासून फळबागांचे होणारे नुकसान थांबवून शेतकरी आपल्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ करू शकतो असे प्रतिपादन यावेळी रविराज यांनी केले. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते. रविराज लोंढे यांनी सांगितलेल्या माहितीबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून बोर्डो पेस्टचा वापर फळबागांमध्ये करण्याचा निश्चय केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य के.एच. निंबाळकर कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक ए. ए .शिंदे कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक बंडगर एस.एस प्राध्यापक एस. एच साळुंके मॅडम वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख नवसुपे सर यांचे मार्गदर्शन लाभले.