*उद्योजक राजू खरे यांचेकडून मैदानी खेळालाही प्रोत्साहन* *कुरुल येथे 71हजार तर पाटकुल येथील कुस्तीसाठी रोख बक्षीस जमा*

*उद्योजक राजू खरे यांचेकडून मैदानी खेळालाही प्रोत्साहन*  *कुरुल येथे 71हजार तर पाटकुल येथील कुस्तीसाठी रोख बक्षीस जमा*

पंढरपूर/प्रतीनीधी

मोहोळ विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मोहोळ मतदार संघातील जनतेला स्वखर्चातून मोठा आधार दिला जात आहे.   कै.विष्णु बाबु धोत्रे यांच्या स्मरणार्थ कुरूल येथे जंगी कुस्त्यांचे आयोजन 17डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी 71हजार रुपयाचे तर खंडोबा यात्रेनिमित्त 19डिसेंबर रोजी पाटकुल येथे होणाऱ्या जंगी कुस्त्यासाठी  1लाख 1हजार असे दोन्हीही ठिकाणी प्रथम क्रमांकाचे बक्षीस आयोजकांकडे रोख सुपूर्द करण्यात आले आहे.

    शनिवार दि 16डिसेंबर रोजी गोपाळपूर येथील फार्महाऊसवर उद्योजक राजू खरे यांनी वरील दोन्ही गावातील आयोजक आणि ग्रामस्थ यांच्याकडे रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली आहे यामुळे खरे यांचेकडून मोहोळ मतदार संघातील इतर सुरू असलेल्या मदतीबरोबर मैदानी खेळातही आपले योगदान देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे.यामुळे उद्योजक राजु खरे यांचे हस्ते निकाली कुस्ती स्पर्धेत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष  .वामन(तात्या) बंदपट्टे,पै.बाळसाहेब चवरे,.तानाजी धोत्रे,.परमेश्वर जगताप, युवा नेते .प्रमोद लांडे,चंदनशिवे सर, शिवसेना मोहोळ तालुका उपप्रमुख अमर सोनवले अदि कार्यकर्ते होते.उपसरपंच .गणेश नामदे, रामदास सातपुते,युवा नेते बापु धोत्रे,मा.संभाजी सातपुते,अरूण चौधरी,शशिकांत सातपुते श्रीकांत काळे,चंदनशिवे सर,युवा नेते गणेश जाधव,उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे, यांचेसह वरील दोन्ही गावातील ग्रामस्थ आणि मोहोळ मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.