* जिवंतपणीच मरण यातना सहन कराव्या लागतात या स्मशानभूमीत..!*.... **उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना होणार आक्रमक* *सुलतानी कारभाराविरोधात मनसे तीव्र आंदोलन करणार*.

करकंब/ प्रतिनिधी
: करकंब हे पंचवीस ते तीस हजार लोकसंख्येचे मोठे गाव आहे. या गावाला तालुक्यातील सर्वात मोठी 17 सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत अर्थात स्थानिक स्वराज्य संस्था असून नाव मोठे आणि लक्षण खोटे अशी चर्चा सध्या करकंब गावाची झाल्याची सुरू असतानाच करकंब येथील स्मशान भूमी चा प्रश्न पुन्हा जोरात पेटणार असल्याने या स्मशानभूमीच्या च्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी लेखी निवेदनाद्वारे सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असल्याने पुन्हा एकदा करकंब मध्ये खळबळ उडाली आहे .
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी सात महिन्यापूर्वी या स्मशान भूमी बाबत ग्रामपंचायत पदाधिकारी यांना असलेल्या समस्याचे निवेदन दिले होते. हे निवेदन घेतानासुद्धा 25 ते 30 हजार लोकांच्या जीवन मरणाची व्यथा मांडणारा प्रश्न मनसेचे पदाधिकारी व युवक वर्ग गेला असताना याचे भान न ठेवता पदाधिकारी आणि सदस्य नेमके कशाच्या घाईत होते . निवेदन घेऊन त्याची समस्या निवारण करण्यापुरता त्यांच्याकडे वेळ नव्हता का अशी चर्चा ग्रामस्थांतून होत आहे. एकीकडे करकंब स्मशान भूमी ची भयानक दुरावस्था झाली असून सगळीकडे घाणीचे साम्राज्य, पाण्याची व्यवस्था नाही, रस्ता नीट नाही अस्वच्छता, विजेचा प्रश्न या ना त्या कारणाने या स्मशानभूमीत प्रेत यात्रा आली तर आलेल्या लोकांना अक्षरशा जिवंतपणी मरण यातना सहन कराव्या लागत आहे.
या स्मशानभूमीत बोरवेल असून ते बंद अवस्थेत आहे ते दुरुस्त करून या ठिकाणी पाण्याच्या साठी लोकांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यात यावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिनांक 22 /3/2021 रोजी याच ग्रामपंचायत ला निवेदन दिले होते. तरीही ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी या स्मशानभूमीच्या व बस स्थानका जवळ महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह आदी विविध प्रश्नाबाबत पुढील काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.