*आंबे येथील वाळू चोरीवर महसूल विभागाची करडी नजर!* *दोन अज्ञात इसमांवर तालुका पोलिसात गुन्हे दाखल*

*आंबे येथील वाळू चोरीवर महसूल विभागाची करडी नजर!*  *दोन अज्ञात इसमांवर तालुका पोलिसात गुन्हे दाखल*

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील वाळू चोरीवर या भागातील स्थानिक महसूल विभागाने आपली करडी नजर ठेवली आहे. यामुळे येथे वाळू चोरी करणाऱ्या दोन अज्ञात इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
    सदरची  घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून पोलीस संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी मंडल अधिकारी आणि आंबे गावचा कोतवाल कार्यालयांमध्ये असताना, गोपनीय माहिती मिळवून आली .येथील ब्राह्मण पानवठयालगत नदीच्या पात्रातून एक टेम्पो चोरून वाळूची वाहतूक करत असल्याचे समजले. मंडळ अधिकारी संतोष सुरवसे आणि कोतवाल महादेव बाबु खिलारे मोटर सायकल वरून तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी समोरून निळ्या रंगाच्या टेम्पो येत असल्याचे दिसून आले या टेम्पो मध्ये वाळू असल्याचा संशय दोघांनाही आला .यावेळी संबंधित टेंपोच्या वाहनचालकास इशारा करून थांबवण्याचा प्रयत्न दोघांनीही केला. परंतु चालकाने थांबल्याचे दाखवून टेम्पो सह भरधाव वेगाने पळ काढला .या टेम्पो मध्ये सुमारे एक ब्रास वाळू असल्याचे मंडल अधिकारी सुरवसे यांच्या निदर्शनास आली .हा बिगर टपाचा के एल 12b 99 15 नंबरचा टेम्पो बघता बघता गायब झाला. सदर वाळूचोरी तील टेम्पो चा मालक आणि चालक या दोघांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आहे कोतवाल महादेव बाबु खिलारे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून, आरोपींविरोधात भा द वि कलम 379 34 तसेच गौण खनिज कायदा 1978 च्या कलम ४(१),४(क)(१) ,२१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


चौकट

पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे होणारी वाळू चोरी कायमच चर्चेत आहे. याठिकाणी पोलिस तसेच महसूल विभागाकडून वारंवार कारवाई होते .यातून आजपर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत .चळे मंडळाचे मंडल अधिकारी संतोष सुरवसे यांनी स्वतः वाळूचोरी पकडण्याचा प्रयत्न केला, आणि यातील दोन अज्ञात वाळू चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.